लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या गावांतील रहिवाशांसाठी मोशीमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ८५० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने ठेकेदारावर मेहरबानी दाखवत पाच टक्के वाढीव दराची निविदा स्वीकारली आहे. ३४० कोटी रुपयांचा निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली. रुग्णालयाच्या कामासाठी तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.

महापालिका हद्दीत १९९७ मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. चिखली, मोशी, चऱ्होली या भागात मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या होत आहेत. नागरीकरण वाढले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, चाकण, जुन्नर, मंचर, आंबेगाव या भागातील नागरिक उपचारासाठी शहरात येतात. हे रुग्ण वायसीएम रुग्णालयात दाखल होतात.

आणखी वाचा- रेल्वेच्या उत्पन्नाची गाडी सुसाट! पुणे विभागात ऑक्टोबरमध्ये ९९ कोटी रुपयांचा महसूल

शहराची लोकसंख्या आजमितीला २७ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून चालवले जाणाऱ्या ७५० खाटांच्या वायसीएम रुग्णालयावर ताण येत आहे. वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी मोशीत ८५० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रसिद्ध केलेल्या निविदा प्रक्रियेत पाच ठेकेदारांनी सहभाग घेतला. यामध्ये तीन निविदा पात्र झाल्या होत्या. मे. वॅसकॉन इंजिनिअर्स लिमिटेड या कंपनीची ४.७३ टक्के वाढीव दराची निविदा स्वीकारली आहे. त्यानुसार ३४० कोटी ६७ लाख ६३ हजार २७३ रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात हा प्रकल्प प्रशासकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे रखडला होता. मात्र, महायुती सरकारच्या काळात प्रकल्पाला गती देण्यात आली. मोशीत होणारे ८५० खाटांचे रुग्णालय जिल्ह्याची आरोग्यवाहिनी म्हणून ओळखले जाईल. प्रशासनाने पुढील प्रक्रिया करुन कामाला सुरुवात करावी. -महेश लांडगे, आमदार भोसरी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Administrations approval of moshi hospitals increased rate tender pune print news ggy 03 mrj
Show comments