शिक्षण हक्क कायद्यातील पंचवीस टक्क्य़ांच्या जागा रिक्त राहिल्या की ‘राखीव जागांवर प्रवेश घ्यायला पालक पुढे येत नाहीत,’ हे वर्षांनुवषे चालणारे कारण यावर्षी मात्र शिक्षण विभागाला बदलावे लागणार आहे. यावर्षी प्रवेश क्षमतेच्या दुप्पट अर्ज आले आहेत. शहरातील ७ हजार ९०० जागांसाठी १५ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. अर्ज भरण्यासाठी विभागाने मुदतवाढ दिली आहे.
गेले दोन वर्षे पंचवीस टक्के राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. एकूण प्रवेश क्षमतेपैकी पन्नास टक्के जागांवरील प्रवेशही होत नाहीत. अशावेळी ‘पालकच पुढे येत नाहीत,’ असे कारण शिक्षण विभागाकडून देण्यात येत होते. यावर्षी मात्र प्रवेश प्रक्रियेला पालकांकडून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील एकूण प्रवेश क्षमतेच्या दुप्पट प्रवेश अर्ज विभागाकडे आले आहेत. पुणे, िपपरी चिंचवड येथील शाळांसह १३ तालुक्यांतील एकूण ७८१ शाळांनी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे. या सर्व शाळांमध्ये मिळून ७ हजार ९०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. यासाठी सोमवार सायंकाळपर्यंत शिक्षण विभागाकडे १५ हजार ९४० अर्ज आले आहेत. अर्जाची ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा