लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील २३ हजार ८५० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया २६ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Nashik Voting, satellite phone, polling stations in Nashik district , Nashik latest news,
मतदानाच्या माहितीसाठी १० उपग्रहाधारित फोन, ८८ धावपटूंचा वापर, नाशिक जिल्ह्यात १०३ मतदान केंद्र संपर्कहिन
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?
Thane district, 578 children came under education stream, Survey of out of school children
ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात
indians want to move abroad indians want opportunity to leave India
भारतीयांना भारत सोडण्याची संधी का हवी असते?

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यातील ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २४२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी दाखल झालेल्या २ लाख ४२ हजार ५१६ अर्जांतून ९३ हजार ९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रतीक्षा यादीत ७१ हजार २७६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

आणखी वाचा-लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामुळे बालेवाडी परिसरातील वाहतुकीत शनिवारी बदल

सुरुवातीला २३ ते ३१ जुलै या कालावधीत प्रवेशासाठी संधी दिल्यानंतर आणखी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनंतर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार शुक्रवारी सायंकाळपर्यंत एकूण ६१ हजार १९३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते. त्यामुळे अद्यापही ४४ हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत.

नियमित विद्यार्थ्यांना पुरेशी संधी दिल्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या प्रतीक्षा यादीतून २३ हजार ८५० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश २६ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत असे गोसावी यांनी सांगितले.