पुणे : शैक्षणिक वर्ष २०२५-२६साठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत सुमारे २३०० शाळांनी नोंदणी केली असून, विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे.

हेही वाचा >>> पिंपरी : महापालिकेची मोठी कारवाई; थकबाकी असलेल्या १२८ मालमत्ता ‘सील’, पुढील…

आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. गेल्यावर्षी शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलामुळे न्यायालयीन प्रकरण निर्माण झाले. त्यानंतर या प्रवेश प्रक्रियेला विलंब होऊन प्रवेशासाठी अधिकाधिक संधी देण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत प्रवेश फेऱ्या राबवण्यात आल्या. राज्यभरातील ९ हजार २१७ खासगी शाळांतील १ लाख ५ हजार २३७ रिक्त जागांपैकी ७८ हजार ३८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे २५ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर आरटीईची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी आप पालक युनियनचे मुकुंद किर्दत यांनी केली होती. त्यानुसार राज्यभरातील शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा सज्ज, गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क

शैक्षणिक वर्ष२०२५-२६ साठी आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेशपात्र शाळांची पडताळणी १८ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्रवेशपात्र शाळांनी शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक आणि वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांसाठी दिलेल्या वेळेत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत.  दरम्यान, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले, आरटीईअंतर्गत शाळा नोंदणीसाठी शाळांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासह अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्याचा प्रयत्न आहे.

Story img Loader