चिन्मय पाटणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : राज्यात शिक्षकांच्या ३० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आतापर्यंत बिंदूनामावली आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या २३ जिल्ह्यातील रिक्त पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

हेही वाचा >>> बारावीचे गुण, सीईटीचे गुण एकत्रिकरणाबाबत लवकरच प्रस्ताव

पेसाअंतर्गत रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र राज्यातील लाखो उमेदवारांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांतील रिक्त पदांच्या जाहिरातीकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण परिषदेसाठी पुण्यात आलेले शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, की शिक्षकांच्या ३० हजार रिक्त पदांच्या भरतीसाठी बिंदूनामावलीसारख्या तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. आतापर्यंत २३ जिल्ह्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. उर्वरित जिल्ह्यांसाठी थांबून एकत्रित जाहिरात प्रसिद्ध करायची झाल्यास त्यात आणखी वेळ जाईल. उर्वरित जिल्ह्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांची जाहिरातही प्रसिद्ध केली जाईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advertisement of teacher vacancies in 23 districts will be released soon says deepak kesarkar ccp14 zws
Show comments