बाणेर येथे एका वकिलावर हल्ला केल्याच्या आरोपावरून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या दोन मुलांसह चौघांना चतु:श्रुंगी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. एम. पिंगळे यांनी त्यांना पाच एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
समीर बाबुराव चांदेरे (वय २५), किरण बाबुराव चांदेरे (वय २३, रा. दोघेही- दत्तकृपा निवास, बाणेर), गणेश बाजीराव इंगवले (वय २३) आणि मनोज बाजीराव इंगवले (वय २२, रा. भूगाव, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या घटनेत वकील आशिष अर्जुन ताम्हाणे (वय २६, रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताम्हाणे हे शिवाजीनगर न्यायालयातील कामकाज संपवून २६ मार्च रोजी घरी जात होते. त्यावेळी बाणेर येथील माउली पेट्रोल पंपासमोर सायंकाळी सव्वा सहा वाजता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तेव्हापासून आरोपींचा शोध सुरू होता. या चौघांना मंगळवारी अटक केल्यानंतर दुपारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी सरकारी वकील ए. के. पाचरणे यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. ती मान्य करत न्यायालयाने पाच एप्रिलपर्यंत चौघांना पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान वकिलांवर हल्ला केल्या प्रकरणाचा वकिलांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. आरोपींना हजर केले त्यावेळी न्यायालयात वकिलांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली होती. त्याच बरोबर दंगल विरोधी पथकही तैनात करण्यात आले होते.
चांदेरे यांच्या दोन मुलांसह चौघांना अटक
बाणेर येथे एका वकिलावर हल्ला केल्याच्या आरोपावरून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या दोन मुलांसह चौघांना चतु:श्रुंगी पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
आणखी वाचा
First published on: 03-04-2013 at 01:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advocate beating case sons of chandere arrested