ढोल-ताशांचा निनाद, ध्वज घेऊन नर्तन करणारे कार्यकर्ते, मधुर सुरागवटींनी भारावून टाकणारे बँडपथकांतील कलाकारांचे वादन, ‘गणपती बाप्पा मोरया‘चा जयघोष अशा चैतन्यपूर्ण वातावरणात करोनाचे विघ्न टळल्याने दोन वर्षांनंतर जल्लोषात उत्सव साजरा करणारी पुण्यनगरी गणेशमय झाली. पारंपरिक मार्गावरून निघालेल्या छोटेखानी देखण्या मिरवणुका आणि मंत्रोच्चाराने भारलेल्या वातावरणात मानाच्या गणपतींची मुहूर्तावर विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापना होईपर्यंत वरुणराजाने विश्रांती घेतल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर बुधवारी वाजत-गाजत गणरायाचे आमगन झाले. दोन वर्षांची मरगळ झटकून गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त असे सारेच गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचे चित्र शहरभर दिसून आले. लोकमान्यांच्या प्रेरणातून मुहूर्तमेढ रोवल्या गेलेल्या पुण्यनगरीच्या वैभवशाली गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ झाला. करोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव दुप्पट उत्साहाने साजरा होणार, याची चुणूक बुधवारी पहिल्याच दिवशी दिसली. 

हेही वाचा : राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरस्कार

कसबा गणपती 

ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाची पंरपरेप्रमाणे मिरवणूक काढून गणरायाची मूर्ती चांदीच्या पालखीतून उत्सव मांडवात आणण्यात आली. सनई चौघडा, प्रभाात बँडपथक तसेच संघर्ष, वाद्यवृंद आणि श्रीराम या तीन ढोल-ताशा पथकांचा समावेश होता. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातील गणेशोत्सवाचे औचित्य साधून हुतात्मा राजगुरू यांचे नातू सत्यशील आणि धैर्यशील राजगुरू यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

 तांबडी जोगेश्वरी

ग्रामदेवता आणि मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणरायाच्या मूर्तीचे चांदीच्या पालखीतून उत्सव मंडपात आगमन झाले. काॅसमाॅस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यापूर्वी काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये नगारावादन, न्यू गंधर्व बँडपथक, शिवमुद्रा आणि ताल ढोल-ताशा पथक आणि विष्णूनाद शंख पथकाचा समावेश आहे. गोंधळींच्या पथकातील संबळवादक आणि ताशावादक यांची अनोखी जुगलबंदी मिरवणुकीत गणेशभक्तांना अनुभवता आली.  

हेही वाचा : Ganesh Utsav 2022 – पुणे : गर्दी वाढल्यास वाहतुकीत बदल; लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने

गुरुजी तालीम मंडळ 

श्री गुरुजी तालीम या मानाच्या तिसऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना उद्योजक पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते दुपारी २ वाजून १० मिनिटांनी करण्यात आली. सुभाष सरपाले आणि स्वप्नील सरपाले यांनी साकारलेल्या आकर्षक पुष्पसजावटीच्या  रथातून गणपतीची मिरवणूक निघाली. नगारावादन, अतुल बेहरे यांचे नादब्रह्म महिलांचे ढोल-ताशा पथक, गर्जना, गुरुजी प्रतिष्ठान आणि येरवडा येथील श्री ही ढोल-ताशा पथके मिरवणुकीत सहभागी झाली होती. 

तुळशीबाग मंडळ 

स्वानंदलोक महालाची प्रतिकृती असलेल्या सरपाले बंधू यांनी साकारलेल्या पुष्परथातून श्री तुळशीबाग मंडळ या मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक निघाली. शिवगर्जना, समर्थ आणि उगम या तीन ढोल-ताशा पथकांच्या कलाविष्काराने गणेशभक्तांना खिळवून ठेवले. गणपती चौकातून कार्यकर्त्यांनी उचलून उत्सव मंडपामध्ये आणलेल्या गणरायाच्या मूर्तीची उद्योजक पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते दुपारी अडीच वाजता प्रतिष्ठापना करण्यात आली. 

हेही वाचा : पुणे : सणासुदीत मार्केट यार्डातील कोंडी फुटली ; अतिक्रमण कारवाईमुळे शिवनेरी रस्ता मोकळा

केसरीवाडा गणेशोत्सव

पालखीतून गणरायाच्या मूर्तीचे केसरीवाड्यातील उत्सव मंडपात आमगन झालेल्या केसरीवाडा गणेशोत्सवाच्या गणरायाची प्रतिष्ठापना डॉ. दीपक टिळक, डॉ. रोहित टिळक, डॉ. प्रणति टिळक, डॉ. गीताली टिळक-मोने यांच्या हस्ते करण्यात आली. त्यापूर्वी काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये बिडवे बंधू यांचे नगरावादन, श्रीराम पथक आणि शिवमुद्रा ही ढोल-ताशा पथके सहभागी झाली होती. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती 

देवळणकर बंधू यांचा चौघडा, प्रमोद गायकवाड यांचे सनईवादन, गंधाक्ष ढोल-ताशा पथक आणि प्रभात ही बँडपथके यांचा सहभाग असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक मंदिरापासून गरुड रथातून निघाली. गिरनार येथील गुरु दत्तात्रेय पिठाधीश्वर स्वामी श्री महेशगिरी महाराज यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी ‘मोरया मोरया’च्या जयघोषात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. हिमालयातील श्री पंचकेदार मंदिराची प्रतिकृती असलेल्या सजवाटीचे आणि विद्युत रोषणाईचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सायंकाळी सात वाजता उद्घाटन करण्यात आले. 

अखिल मंडई मंडळ 

हेही वाचा : राज्यात दलितांवर बहिष्काराच्या घटना, चंद्रकांत पाटील म्हणाले, “या प्रत्येक घटनेचा…”

मंगळवार पेठेतील श्री स्वामी समर्थ मठाचे प्रमुख प्रतापकाका गोगावले आणि अपर्णा गोगावले यांच्या हस्ते अखिल मंडई मंडळाच्.ा शारदा गजाननाची दुपारी १२ वाजता प्रतिष्ठापना करण्यात आली. झुंबरांनी सजविलेल्या भव्य स्वप्नमहालातील झोपाळ्यावर शारदा गजानन विराजमान झाले. त्यापूर्वी फुलांनी सजविलेल्या मंगल कलश रथातून शारदा गजाननाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये नगारावादन आणि तीन पथकांचा समावेश होता. 

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती 

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणरायाची उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यापूर्वी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन येथून निघालेल्या मिरवणुकीमध्ये जगदंब, सामर्थ्य, अभेद्य, वाद्यवृंद, चेतक, कलावंत आणि श्रीराम पथक अशा सात ढोल-ताशा पथकांचा समावेश होता.