पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्ताल्याचा खंडणी विरोधी पथकाने तीन सराईत गुन्हेगारांना पिस्तूल व दोन राउंडसह अटक केली. माथाडीच्या कामावरून झालेल्या वादानंतर ठराविक उद्देश साध्य करण्याचे हेतूने पिस्तूल मागविल्याचे तपासात निष्पन्न झाले. किशोर बापू भोसले ( वय ३१, रा. पुनावळे गावठाण) आणि अमित  दत्तात्रय पाटूळे ( वय २३,  शिंदेवस्ती चौक, रावेत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सराईत गुन्हेगार किशोर भोसले व अमित पाटुळे हे कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने पुनावळे येथील स्मशानभूमी येथे येणार असून त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथकातील पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींनी पिस्तूल आणि राऊंड  पुनावळे येथील अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले याच्या सांगण्यावरून तडीपार आरोपी रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार याच्याकडून आणले असल्याचे सांगितले.

हेही वाचा >>> पिंपरी : तीन सराईत गुन्हेगार अटकेत; गंभीर गुन्हा करण्याचा प्रयत्न फसला

पोलिसांनी धनज्याला अटक केली. त्याच्याकडे सखोल तपास केला असता माथाडीच्या कामावरून झालेल्या वादानंतर ठराविक उद्देश साध्य करण्याचे हेतूने पिस्तूल मागविल्याचे उघड झाले. अटक आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध हिंजवडी व वाकड पोलीस ठाणे येथे दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत करणे असे गुन्हे दाखल आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After a dispute over mathadi work pistol three criminals arrested pune print news ggy 03 ysh