बारामतीनंतर अजित पवारांचा पिंपरी- चिंचवड बालेकिल्ला हा ढासळण्याच्या मार्गावर आहे. अजित पवारांचे निष्ठावंत समजले जाणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अजित गव्हाणे यांच्यासह शहरातील इतर १५ माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतली. यामध्ये माजी आमदार विलास लांडे यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांचा देखील समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार गटासाठी ही जमेची बाजू असली तरी पिंपरी- चिंचवड शहरातून विश्वासहर्ता गमावलेल्या विलास लांडे यांच्या तालमीत तयार झालेल्या अजित गव्हाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा शरद पवार गटाला आगामी काळात किती फायदा होणार हे निश्चित सांगता येत नाही. भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघावरील पकड पाहता त्याच मतदारसंघात येणाऱ्या अजित गव्हाणे यांचा विधानसभा किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीत किती फायदा होईल? हा प्रश्नच आहे.

हेही वाचा – सुप्रिया सुळेंनी पतीसह तुकाराम महाराजांच्या पादुकांचे घेतले दर्शन, राज्य सरकारवर केली सडकून टीका

हेही वाचा – लोणावळा : भुशी धरण ओव्हरफ्लो; पर्यटकांची गर्दी

पिंपरी- चिंचवड शहरावर सर्व समावेशक वर्चस्व असणारा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे एकही नेता नाही. अजित गव्हाणे यांनीही राष्ट्रवादी अजित पवार गटाची सूत्रे हातात घेतल्यानंतर ते केवळ भोसरीचे शहराध्यक्ष होते का? असा प्रश्न त्यांच्या एकूण कारकिर्दीत उपस्थित झाला होता. अजित गव्हाणे यांनी इतर पक्षात देखील विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती चाचपणी केल्याचं बोललं जात आहे. आधीच भोसरी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी अजित गव्हाणे इच्छुक आहेत. भोसरी विधानसभा भाजपला सुटते यात तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे अजित गव्हाणे हे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटात चाचपणी करत असल्याचं बोललं जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After baramati ajit pawar pimpri chinchwad bastion is on the verge of collapse 16 former corporators meet sharad pawar kjp 91 ssb