लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची ओबीसी भटके विमुक्त समाजाची इंदापूर येथे शनिवारी (९ डिसेंबर) भव्य सभा झाली. भुजबळांनी या सभेमधून गावबंदी कायद्याला धरून नसल्याचा पुनरुच्चार केला. तसेच सर्वपक्षाच्या नेत्यांना गावबंदी आहे, तर आमदार रोहित पवार यांच्या युवा यात्रेचे स्वागत कसे होते?, असा सवालही त्यांनी सभेत केला होता. या सभेनंतर आमदार गोपिचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पल फेकण्यात आली. ही सभा आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी (११ डिसेंबर) इंदापूर बंदची हाक देण्यात आली आहे. इंदापूर येथील तरूण गावबंदीविरोधात एकवटले आहेत.

आणखी वाचा-प्रसूतीनंतर तीनपैकी एका महिलेला दीर्घकालीन आरोग्य समस्या! नवीन संशोधनातील निष्कर्ष

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता गरीब मराठा नागरिकांना आरक्षण मिळावे, अशी सर्व ओबीसी नेत्यांची भूमिका आहे. मात्र, काही जणांकडून लोकप्रतिनिधींना गावबंदी, जाळपोळ करण्यात येत आहे. हे कायद्याला धरून नाही, त्यामुळे इंदापूरमध्ये सोमवारी बंद पुकारण्यात आला आहे. जोवर नेत्यांना करण्यात आलेली गावबंदी उठविली जात नाही, तोवर ओबीसी आंदोलन थांबणार नाही, असे डॉ. शशिकांत तरंगे, पांडुरंग शिंदे, माउली वाघमोडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ओबीसी नेत्यांना जाणीवपुर्वक टार्गेट केले जात आहे. ओबीसी नेत्यांना धमक्या देण्यात येत आहेत, तर सामान्या ओबीसी नागरिकांचे काय?, गावबंदी कोणत्या कायद्यात बसते?, असा सवाल करत या तरुणांनी गावबंदी उठत नाही, तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After chhagan bhujbals meeting obc community united against village ban pune print news psg 17 mrj