तीन दिवसांत वीस हजार दुचाकीस्वारांवर कारवाई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेल्मेटसक्तीला वारंवार विरोध करणाऱ्या पुण्यात एक जानेवारीपासून हेल्मेट सक्ती पुन्हा लागू झाली आणि त्यानंतर कारवाई आणि तिला विरोधही तीव्र होत असतानाच हेल्मेटच्या खरेदीतही मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे.
राज्यभरात न्यायालयाच्या निकालानुसार हेल्मेटसक्ती लागू आहेच. त्यामुळे पुण्यात ती ‘लागू’ झाली आहे, असे नव्हे, तर त्या सक्तीची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. पोलीस प्रशासन हेल्मेट सक्तीबाबत ठाम असून गेल्या आठवडय़ापासूनच शहरात हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवरील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. तर, पोलीस आयुक्तांनी एकदा चारचाकीऐवजी दुचाकीवरून हेल्मेट घालून पुण्यात फिरावे, मगच हेल्मेट सक्तीचा निर्णय घ्यावा, अशी आग्रही भूमिका घेत ‘हेल्मेट सक्तीविरोधी कृती समिती’नेही आंदोलन सुरू केले आहे. त्या बरोबरच हेल्मेट खरेदीही शहरात जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत वाहतूक शाखेकडून हेल्मेट परिधान न करणाऱ्या वीस हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कारवाईबरोबर हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांच्या शोधासाठी पोलिसांकडून शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापरही करण्यात येत आहे.
हेल्मेट सक्तीच्या आदल्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबरला दिवसभरात हेल्मेट न वापरणाऱ्या पाच हजार, तर १ जानेवारीला सात हजार ४९० आणि मंगळवारी साडेसात हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. दुसरीकडे हेल्मेट सक्तीविरोधी कृती समितीकडून गुरुवारी (३ जानेवारी) सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात येणार आहे.
हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी हेल्मेट सक्तीला विरोध करणारे नागरिक अलका चित्रपटगृहाजवळील लोकमान्य टिळक चौकात एकत्र येणार आहेत. तेथून पोलीस आयुक्तालयावर कार्यकर्ते दुचाकीने जाणार आहेत. या आंदोलनात सहभागी होणारे कार्यकर्ते हेल्मेट परिधान करणार नाहीत. कार्यकर्ते सविनय कायदेभंग आंदोलन करणार असून पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांना कृती समितीकडून निवेदन देण्यात येणार आहे.
कृती समितीकडून शहरातील खासदार आणि आमदारांचे मोबाइल क्रमांक समाज माध्यमातून प्रसारित करण्यात आले असून पोलिसांनी कारवाई केल्यास लोकप्रतिनिधींच्या मोबाइल क्रमांकांवर संदेश पाठवून त्यांना या सक्तीबाबत प्रतिक्रिया नोंदवण्यास भाग पाडावे, असेही आवाहन कृती समितीने केले आहे. असे असले तरी शहरात हेल्मेट खरेदीतही वाढ झाली आहे. दुकानांमध्ये हेल्मेट खरेदी करणाऱ्या ग्राहकांची मोठी गर्दी सध्या दिसत आहे.
विरोधी पक्षांची कृती समिती
हेल्मेट सक्तीची घोषणा करण्यात आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेनेच्या पुढाकाराने हेल्मेट विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. ‘ग्राहक पेठ’चे सूर्यकांत पाठक यांच्याकडे समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना हेल्मेट सक्तीच्या विरोधात आग्रही असणाऱ्या भाजपने आतापर्यंत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे विरोधकांनी हेल्मेट सक्ती हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे.