पुणे : ‘मन की बात’ या जनतेशी साधल्या जाणाऱ्या संवादानंतर आता ‘मन का गीत’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम शनिवारी (१४ डिसेंबर) गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून रसिकांसमोर सादर होणार आहे. पुण्यात शुभारंभाचा प्रयोग होणाऱ्या या कार्यक्रमाचे राज्यभरात विविध ठिकाणी तसेच दिल्लीमध्ये प्रयोग होणार आहेत.

मोदी यांच्या ‘आँख ये धन्य है’ आणि ‘साक्षी भाव’ या पुस्तकांमधील कवितांवर आधारित ‘मन का गीत’ या विशेष कार्यक्रमाची निर्मिती संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. कार्यक्रमाची संकल्पना सुनील महाजन यांची असून संहितालेखन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य यांचे तर दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेते योगश सोमण यांचे आहे. नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले असून डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीत संयोजनाची बाजू सांभाळली आहे.

tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Saleel Kulkarni Share Special Post For Devendra Fadnavis of New Chief Minister Of Maharashtra
“एखाद्याने स्वप्न पाहावे आणि पूर्ण करावे तर असे”, देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानिमित्ताने सलील कुलकर्णींची खास पोस्ट, म्हणाले…
suyash tilak and suruchi adarkar
“त्यावेळी मी सुरुचीशी खूप…”, सुयश टिळकने सांगितली ‘का रे दुरावा’ मालिकेदरम्यानची आठवण; म्हणाला, “मी थेट…”
devendra fadnavis became the chief minister of Maharashtra
ते अखेर ‘आलेच’, त्या फलकांचा अर्थ आत्ता उलगडला
shreyas talpade dubbing for allu arjun
Pushpa 2 : हिंदी डबसाठी पुन्हा एकदा मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा आवाज! अल्लू अर्जुनबद्दल म्हणाला, “आत्मविश्वास, स्वॅग अन्…”
zee marathi lakhat ek amcha dada and shiva serial actors dance together
नवरी नटली…; ‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकेतील कलाकारांचा जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “सगळे स्वत:च्या धुंदीत…”

हेही वाचा – साधकाच्या वेशात चोरी करणारा चोरटा गजाआड; पुणे, पिंपरीसह मुंबईत वाईत चोरीचे गुन्हे

बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. मोदी यांच्या जयश्री जोशी यांनी अनुवादित केलेल्या आणि उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मराठी कवितांच्या ‘नयन हे धन्य हे’ या पुस्तकाचे प्रकाशन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असून नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नीलेश कोंढाळकर आणि सुनील महाजन यांनी सोमवारी दिली.

हेही वाचा – आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण, पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध

पुस्तकातील निवडक कविता व गीतांचे अभिवाचन सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जमेनिस आणि अक्षय वाटवे करणार आहेत. शिल्पा दातार, शर्वरी ओतरी, श्रुतिका अत्रे, अदिती देवधर, ईश्वरी बापट, प्राजक्ता सांभू, अंतरा बोरगावकर विविध रचनांवर नृत्यविष्कार सादर करणार आहेत. निकिता मोघे यांचे नृत्य दिग्दर्शन आहे.

Story img Loader