पिंपरी : तळवडे येथील आगीच्या घटनेनंतर जखमींना तत्काळ उपचार मिळणे आवश्यक असताना शहरात भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा नसल्याने रुग्णांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने नवीन आकुर्डी, वायसीएम किंवा थेरगाव रुग्णालयात जळीत कक्ष (बर्न वॉर्ड) सुरू करण्यासाठी हालचाल केली आहे.

तळवडे येथील केकवर लावायच्या शोभेच्या फटाक्याच्या (स्पार्कल कॅण्डल) मेणबत्ती कारखान्यात ८ डिसेंबर रोजी आग लागून झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला. वैद्यकीय विभागांतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये आठ मोठी रुग्णालये, २७ दवाखाने, २० आरोग्य केंद्र आहेत. ७५० खाटांच्या क्षमतेचे सर्वांत मोठे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम), ४०० खाटांचे थेरगाव, शंभर खाटांचे नवीन भोसरी, १३० खाटांचे नवीन आकुर्डी आणि १२० खाटांचे नवीन जिजामाता यासह एक हजार ५८९ खाटांची व्यवस्था महापालिकेच्या रुग्णालयांत आहे. परंतु, त्यातील कोणत्याही रुग्णालयात जळीत कक्ष नाही. त्यामुळे भाजलेल्या रुग्णांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करावे लागते.

Firing at the house of an independent candidate in Jalgaon news
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Hadapsar fire
Video: पुण्यातील हडपसर भागातील जुन्या इमारतीत आग, लहान मुलांसह सात रहिवाशांची सुटका
Fire At BKC Station
Mumbai Metro : मुंबईतल्या बीकेसी मेट्रो स्टेशनला आग, प्रवाशांना काढण्यात आलं बाहेर, अग्निशमन दलाचे १० ते १२ बंब घटनास्थळी
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
blast at IOC plant gujarat
गुजरात: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन रिफायनरीत ब्लास्ट; दोन दशकांपूर्वीच्या भीषण दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या!
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
Anant Madhavan
सेटवर लागलेली आग, ५२ जणांचा मृत्यू आणि प्रसिद्ध अभिनेत्यावर ७३ सर्जरी; अनंत माधवन आठवण सांगत म्हणाले, “ती रात्र…”

हेही वाचा… पुणे : लोणी काळभोर भागात फर्निचरच्या गोदामाला आग

वायसीएममध्ये जळीत कक्ष नसल्याने केवळ प्रथमोपचार केले जातात. योग्य उपचारासाठी रुग्ण ससूनमध्ये दाखल होईपर्यंत उशीर झालेला असतो. परिणामी, रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या १४ वर्षांपासून जळीत कक्षाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र तळवडे येथील घटनेनंतर महापालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. नवीन आकुर्डी, वायसीएम किंवा थेरगाव रुग्णालयात जळीत कक्ष उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा… Maharashtra Assembly Winter Session 2023 Live : सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, सरकार सकारत्मक असल्याची अजित पवारांची प्रतिक्रिया

जळीत कक्ष उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आयुक्त शेखर सिंह यांच्याशी चर्चा करून कोणत्या रुग्णालयात हा कक्ष सुरू करायचा, याबाबतचा निर्णय घेतला जाईल. – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी

औद्योगिकनगरी म्हणून शहर ओळखले जाते. कंपन्या, कारखाने शहरात आहेत. आगीची दुर्घटना घडल्यास जखमींना तत्काळ उपचार मिळावेत. यासाठी शहरात जळीत कक्ष सुरू करण्याची मागणी अधिवेशनात शासनाकडे केली आहे. – महेश लांडगे, आमदार