गणेश यादव

पिंपरी : क्रिकेटच्या ड्रीम ११ मध्ये सामना जिंकून दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकल्यानंतर पोलीस गणवेशात मुलाखत दिल्याने निलंबित झालेले फौजदार सोमनाथ झेंडे यांनी शरीर तंदुरुस्त ठेवण्यावर भर दिला आहे. कर्तव्यावर जायचे नसल्याने झेंडे पहाटे सहा वाजताच व्यायमशाळेत जाऊन दोन तास व्यायाम करत आहेत.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
india sets conditions for elon musk s starlink satellite licence approval
एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ला भारतीय अवकाश खुले; मात्र परवाना नियम-शर्तींच्या पूर्ततेनंतरच केंद्रीय मंत्र्यांचे प्रतिपादन
KL Rahul Statement on Lucknow Super Giants Exit Reveals Reason Ahead of IPL 2025 Auction Said I wanted Freedom
KL Rahul: “मला थोडं स्वातंत्र्य मिळेल अशा संघात…”, केएल राहुलचे लखनौने रिलीज केल्यानंतर मोठं वक्तव्य, संघ सोडण्यामागचं सांगितलं कारण
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?

पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयात सोमनाथ झेंडे हे कार्यरत होते. झेंडे यांनी ड्रीम ११ वर विश्वचषकातील बांग्लादेश विरुद्ध इंग्लंड या सामन्यावर टीम लावली होती. त्यांचा संघ (टीम) जिंकला. त्यामुळे त्यांना दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. कर्तव्यावर हजर असताना गेम खेळणे आणि जुगाराला प्रोत्साहन दिल्याचा दावा करत काही जणांनी झेंडे यांच्यावर कारवाईची मागणी केली. परंतु, ड्रीम ११ या ऑनलाइन खेळावर भारतात बंदी नाही. सन २००८ पासून हे उपयोजन सुरू आहे. ड्रीम ११ विश्वचषकाचे भागीदार आहे. भारतीय खेळाडूंच्या गणवेशावर त्याचे चित्र (लोगो) आहे.

आणखी वाचा-पुणे : कामगाराला बेदम मारहाण करुन खून; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यासह १३ जणांविरुद्ध गुन्हा

एकप्रकारे खेळाडूंकडून त्याची जाहिरातच केली जाते. मग, झेंडे यांच्यावर कारवाई कशासाठी केली जात आहे, असा सवाल काही जणांकडून उपस्थित करण्यात आला. प्राथमिक चौकशीनंतर गणवेशात मुलाखत देणे, पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणे, गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी १८ ऑक्टोबर रोजी झेंडेंचे निलंबन करत विभागीय चौकशीचे आदेश दिले.

आता निलंबनानंतर झेंडे यांनी स्वतःचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यावर भर दिला. कामावर जायचे नसल्याने ते दररोज व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करत आहेत. पहाटे सहा ते आठ दोन तास शरीरासाठी देत आहेत. त्यासाठी महिन्याला आठ ते दहा हजार रुपयांचा खर्च येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-दक्षिण कोकण, कोल्हापुरात मेघगर्जनेसह पाऊस?

बक्षिसाच्या रकमेची प्रतीक्षा

सोमनाथ झेंडे यांनी १० ऑक्टोबर रोजी दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले. परंतु, बक्षिसाचे पैसे अद्यापही त्यांना मिळाले नाहीत. पुढील १२ दिवसांत पैसे मिळण्याची शक्यता आहे. दीड कोटीवर ३० टक्के कर लागणार आहे. दरम्यान, पैसे मिळण्यापूर्वीच त्यांच्यावर निलंबनाची वेळ आली.

निलंबनामुळे वेळ असल्याने शरीरयष्टी तयार करण्यावर भर दिला आहे. दररोज दोन तास व्यायाम करतो. निलंबनावर मला काही बोलायचे नाही. विभागीय चौकशी सुरू आहे. -सोमनाथ झेंडे, निलंबित फौजदार