पुणे : छत्तीसगडमधील रायपूर येथून मेंदुमृत व्यक्तीचे फुफ्फुस पुण्यात आणून त्याचे रुग्णावर प्रत्यारोपण करण्याची कामगिरी डॉक्टरांनी केली आहे. यामुळे या रुग्णाला जीवदान मिळाले आहे. हा रुग्ण स्वाइन फ्लू संसर्गासह गंभीर श्वसनविकाराने त्रस्त होता. त्याचे फुफ्फुस निकामी होऊ लागल्याने त्याला प्रत्यारोपणाची आवश्यकता होती. ग्रीन कॉरिडॉरमुळे रायपूरमधून फुफ्फुस आणून पुण्यातील रुग्णावर त्याचे वेळेत प्रत्यारोपण करणे शक्य झाले.

रायपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाला मेंदुमृत घोषित करण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्याचे फुफ्फुस पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रुग्णाला देण्यात आले. काळजीपूर्वक आणि ठरावीक वेळेच्या आतच अवयवांचे प्रत्यारोपण करणे आवश्यक असते. रायपूरहून हवाईमार्गे फुफ्फुस पुणे विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर वाहतूक पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉरद्वारे डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यासाठी एकूण तीन तासांचा कालावधी लागला. त्यासाठी रायपूर आणि पुणे पोलीस, तसेच विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी मदत केली. विक्रमी वेळेत १ हजार ३३ किलोमीटर अंतर पार करून छत्तीसगडमधून फुफ्फुस केवळ तीन तासांत पुण्यात पोहोचल्याने ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शक्य झाली.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
Ex PM Manmohan Singh
Dr. Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कुठे राहात होते? या बंगल्याची खासियत काय?
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
three day book Exhibition held on occasion of Granthali Readers Day attracting over 3000 visitors from Thane
चरित्र ग्रंथ, कवितासंग्रह सह वैचारिक विषयांवरील पुस्तकांना ठाणेकरांची पसंती

आणखी वाचा-‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव डावलले

रुग्णालयात फुफ्फुस पोहोचताच तातडीने रुग्णावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णाने अवयव प्रत्यारोपणाला योग्य प्रतिसाद दिला असून, तो लवकरच बरा होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. हा रुग्ण स्वाइन फ्लूसह गंभीर श्वसन विकाराने आजारी होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला एक्स्ट्राकॉर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशन (ईसीएमओ) पद्धतीने ऑक्सिजन देण्यात येत होता. आजार अधिक बळवल्याने त्याला फुफ्फुस प्रत्यारोपणाची गरज होती. या रुग्णावर अखेर यशस्वीपणे फुफ्फुस प्रत्यारोपण झाले आहे. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन आठवड्यांमध्ये झालेले हे दुसरे फुफ्फुस प्रत्यारोपण आहे.

आणखी वाचा-‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेच्या लाभार्थ्यांना रक्कम वितरणास शनिवारपासून प्रारंभ

अवयवदान हे एक उदात्त कार्य आहे. या बहुमूल्य दानामुळे आम्ही एक मौल्यवान जीव वाचवू शकलो. आम्ही जलद कृती करून वेळेत अवयव आणले आणि त्याचे प्रत्यारोपण केले. रायपूरहून पुण्याला सुखरूप अवयव आणून प्रगत तंत्रज्ञानामुळे आणि कुशल डॉक्टरांच्या साहाय्यामुळे यशस्वीरीत्या प्रत्यारोपण केले. -डॉ. संदीप अट्टावार, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

Story img Loader