गॅस कनेक्शन देणाऱ्या एजन्सीने दिले लेखी लिहून

अंध असल्याने महिलेला गॅस एजन्सीने गॅस कनेक्शन देण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यात घडला आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. संगीता कोल्हापुरे यांची नुकतीच मुंबईतून लोणावळ्यात बदली झाली आहे. त्या भाड्याच्या खोलीत राहतात. स्वयंपाकासाठी त्यांना गॅस हवा असल्याने त्यांनी लोणावळ्यातील परमार गॅस एजन्सीकडे गॅसची मागणी केली. ‘तुम्ही अंध आहात त्यामुळे आम्ही तुम्हाला गॅस देऊ शकत नाही’. असं परमार गॅस एजन्सीने लेखी लिहून दिलं आहे.

हेही वाचा >>> पुणे- नाशिक महामार्गावरील ‘सरकार’ लॉजवर सुरू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी टाकला छापा

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय

सरकारने याची लवकरात लवकर दखल घ्यावी तसेच कुठल्याही अंध व्यक्तीला अशा त्रासाला सामोरे जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी अस आवाहन संगीता कोल्हापुरे यांनी सरकारला केले आहे. संगीता कोल्हापुरे या अंध असून बँकेत नोकरी करतात. नुकतीच मुंबईहून त्यांची लोणावळ्यात बदली झाली आहे. त्या भाड्याच्या खोलीत राहात असून त्यांना स्वयंपाकासाठी गॅस ची गरज होती. लोणावळ्यातील परमार गॅस एजन्सीकडे गॅसची रीतसर मागणी त्यांनी केली. परंतु, गॅस एजन्सीने ‘तुम्ही अंध आहात यामुळे तुम्हाला गॅस देऊ शकत नाही’. असे स्पष्टपणे सांगत लेखी उत्तर दिले आहे. संगीता कोल्हापुरे यांनी आता थेट सरकारला आवाहन करत लवकरात -लवकर याची दखल घेऊन आम्हाला गॅस मिळावा अस आवाहन त्यांनी केल आहे.

हेही वाचा >>> पुणे : संगणक अभियंता ‘सेक्सटाॅर्शन’च्या जाळ्यात; १० लाखांची फसवणूक

संगीता कोल्हापुरे यांना गॅस देण्यासंबंधी आम्ही कंपनीशी बोललो होतो. परंतु, त्यांनी संगीता या अंध असल्याने गॅस देण्यास नकार दिला असल्याचं परमार गॅस एजन्सी चे प्रकाश परमार यांनी सांगितल आहे. तसेच, भविष्यात त्या अंध असल्यामुळे दुर्घटना होऊ शकते असं म्हटलं आहे. आम्ही सहकार्याची भूमिका घेऊन त्यांना गॅस देण्याचा प्रयत्न करू असही अधोरेखित केले आहे. एकीकडे घरोघरी गॅस मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्वला गॅस योजना आणली. लाखो कुटुंबाला योजने मार्फत गॅस मिळाला. असं असलं तरी आता अंध बांधवांना गॅस मिळवण्यासाठी नको ती कसरत करावी लागते आहे.