मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांनी आमदारांची घरं आणि कार्यालये पेटवल्याची घटना घडली होती. हेच जाळपोळीचं लोन पिंपरी- चिंचवड मध्ये येऊन पोहचल असून आळंदी दिघी रोडवर टायर पेटवण्यात आली यामुळे काही काळ आळंदीहून दिघी आणि भोसरी ला जाणाऱ्या दिशेने वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी पोलीस पोहचले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. आंदोलक असे हिंसक होतील याबाबत पोलिसांना कुठलीही माहिती नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा >>> आळंदीत तरुणाचे मराठा आरक्षणासाठी शोलेस्टाईल आंदोलन; मनधरणी करण्यासाठी कुटुंब, पोलीस, अग्निशमन यंत्रणा…
मराठा आरक्षणाचा मुद्दा देशभर गाजतो आहे. जरांगे पाटील हे बेमुदत उपोषणावर बसले असून त्यांचा मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे. आज बीडमध्ये अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांचं घर आणि कार्यलये आंदोलनकर्त्यांनी पेटवून दिले. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. याच जाळपोळीचे लोणी पिंपरी चिंचवड मध्ये पोहोचला असून आळंदी- दिघी रोडवर टायर पेटवून मराठा आंदोलकांनी एक- मराठा लाख- मराठा च्या घोषणा देत रस्ता अडवला होता. काही काळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे. मराठा आरक्षणा प्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलीस सतर्क असून काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पिंपरी- चिंचवड पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. अशातच रस्त्यावर टायर पेटवून दिल्याने वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं.