पुणे : व्यवसायात भरभराट, पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन एका व्यावसायिकाने पत्नीला सर्वांसमोर आंघोळ करायला लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून व्यावसायिकासह, सासू, सासरे आणि मांत्रिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू, सासरे तसेच मांत्रिकाच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार, फसवणूक, नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला व्यावसायिक कात्रज परिसरातील आंबेगाव परिसरात राहायला आहे. त्याचा २०१३ मध्ये तक्रारदार महिलेशी विवाह झाला होता. विवाहानंतर तिचा पती, सासू, सासऱ्यांनी छळ सुरू केला. तिला शिवीगाळ करुन मारहाणही करण्यात आली होती. महिलेच्या आई-वडिलांनी हिरेजडीत सोन्याचे दागिने विश्वासाने पतीकडे ठेवण्यास दिले होते तसेच त्यांच्या सदनिकेची कागदपत्रे दिली होती.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला

दागिन्यांचा परस्पर अपहार करुन महिलेच्या आई-वडिलांनी दिलेल्या सदनिकेची कागदपत्रे एका बँकेत कर्ज प्रकरणात तारण म्हणून ठेवली होती. कागदपत्रांच्या आधारे ७५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर पती एका मांत्रिकाच्या संपर्कात आला. व्यवसायात भरभराट, घरात सुखशांती तसेच पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाने व्यावसायिकाला काही तोडगे सांगितले होते. त्यानंतर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या पतीने महिलेला सर्वांसमोर आंघोळ करायला लावली. त्यानंतर पतीकडून वेगवेगळ्या प्रकारे छळ करण्यात आला तसेच मारहाणही करण्यात आली. पतीने एक ते दोन कोटी रुपयांची फसवणूक केली, असे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहेत. पती, सासू, सासऱ्यांच्या त्रासामुळे अखेर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर तपास करत आहेत.

Story img Loader