कांद्याच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेतील पुरवठा सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून १९ ऑगस्टपासून कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के भरीव शुल्क आकारले आहे. या निर्णयावर कांदा उत्पादक शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली असून त्या निर्णयाच्या निषेधार्थ पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाबाहेर ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. तर केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा… पुणे : गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्यासाठी मुदतवाढ
हेही वाचा… पुणे महापालिकेकडून पुन्हा उरुळी देवाची, फुरसुंगीत विकासकामे… ‘एवढ्या’ कोटींच्या कामांना मंजुरी
यावेळी बाबा आढाव म्हणाले की, राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच सत्र काही थांबत नाही. त्यावर केंद्र आणि राज्य सरकारने विशेष उपाययोजना करण्याच्या गरज आहे.पण त्यावर कोणत्याही प्रकारची भूमिका मांडली जात नाही.त्यात आता कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांनी जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या निर्णयाविरोधात आम्ही ठिय्या आंदोलन केले आहे. केंद्र सरकारने निर्यात शुल्कचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा भविष्यात तीव्र लढा उभारणार असल्याचा इशारा यावेळी दिला.