पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून सर्व सामान्य नागरिकांसह PMPML कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्याचं काम केले आहे. PMPML कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागु करण्यात यावा आणि इतर काही मागण्यांसाठी पुणे महापालिकेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले होते. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी PMPML कर्मचारी झाले होते. यावेळी महापालिकेतील सत्ताधारी भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आंदोलनात बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, “करोनाच्या संकट काळात PMPML कामगारांनी शहरातील नागरिकांना सेवा देण्याच काम केले आहे. परंतु त्या काळातील सेवेचे वेतनही महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपाने कर्मचाऱ्यांना दिले नाही. आता त्याच दरम्यान या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग पासून वंचित ठेवण्याचे काम भाजप नेतेमंडळी करीत आहे. ही निषेधार्थ बाब असून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, अन्यथा आम्ही भविष्यात शहरातील भाजपाच्या आजी माजी खासदार, आमदार यांच्या घराबाहेर आंदोलन करू,” असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation by ncp outside pune municipal corporation for demands of pmpml employees hrc
Show comments