शहरात डेंग्यूचा प्रश्न मोठय़ा प्रमाणावर भेडसावत असूनही आरोग्याच्या प्रश्नाबाबत महापालिका प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी पालिका भवनात निदर्शने केली. आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन पालिकेच्या दारात ठिय्याही दिला.
डेंग्यूच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व शहर प्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले, आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, गटनेता अशोक हरणावळ, नगरसेवक प्रशांत बधे, योगेश मोकाटे, भरत चौधरी, संगीता ठोसर यांनी केले. महापालिका भवनतील निदर्शनांनंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. आरोग्याच्या प्रश्नाबाबत महापालिकेचा आरोग्य विभाग अत्यंत उदासीन असून आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेमुळे डेंग्यूचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. कोणतीही ठोस पावले आरोग्य विभागाने उचललेली नाहीत, अशी तक्रार या वेळी करण्यात आली.
संपूर्ण आरोग्य विभाग रस्त्यावर उतरणे आवश्यक असताना तशी कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही. याची गंभीर दखल घेऊन तातडीने स्वच्छता व अन्य कार्यवाही सुरू करावी, अशीही मागणी शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा