‘अन्याय जिथे, यल्गार तिथे’ अशी घोषणा करत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा समावेश असलेली ‘यल्गार सेना’ या संघटनेची पिंपरीत स्थापना झाली. निगडीतील दुर्गादेवी उद्यानात संगनमताने होणाऱ्या चंदन तस्करीचा भंडाफोड करत त्याविरोधात संघटनेने तीव्र आंदोलन केले.
भाजपचे सरचिटणीस व माजी नगरसेवक राजू दुर्गे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या संघटनेने पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. सामान्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी, कार्यकर्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पक्षीय चौकट बाजूला ठेवून आम्ही एकत्र आल्याचे दुर्गे, पोपट हजारे, शैला मोळक, जितेंद्र मदने आदींनी सांगितले. दुर्गादेवी उद्यानातील मंदिराशेजारील चंदनाची झाडे चोरीला जातात. प्रचंड सुरक्षा व्यवस्था असतानाही होणाऱ्या या चोऱ्या संगनमताने होतात, असा मुद्दा उपस्थित करून यल्गार सेनेने आंदोलन केले. दुर्गे, श्रीकांत धनगर, राजश्री जायभाय, रूपाली ढगे, रसिका परब, मंगला बुधनेर, मधुकर लंबाते आदींनी सहभाग घेतला. याबाबतचे निवेदन आयुक्त राजीव जाधव यांना देण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा