पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२३ ऐवजी २०२५ पासून करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने स्पर्धा परीक्षार्थींसह शुक्रवारी आंदोलन केले. शुक्रवारी रात्री थंडीत कुडकुडत आंदोलन कायम ठेवल्यानंतर अठरा तासांनंतर हे आंदोलन शनिवारी स्थगित करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमपीएससीने राज्यसेवा परीक्षा योजनेत बदल केला आहे. या बदलाची अंमलबजावणी २०२३ पासून लागू करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, काही स्पर्धा परीक्षार्थींचा या निर्णयाला विरोध आहे. त्यामुळे, राज्यसेवेतील बदल २०२५ पासून लागू करण्यासाठी काँग्रेसने शुक्रवारी टिळक चौकात आंदोलन सुरू केले. आंदोलक रात्रभर थंडी असतानाही रस्त्यावर बसून राहिले होते. अखेर शनिवारी आंदोलन स्थगित करण्यात आले.

हेही वाचा – जी-२० परिषदेसाठी पुण्यात परदेशी पाहुणे येण्यास सुरूवात, जिल्हाधिकाऱ्यांनी ओमानच्या प्रतिनिधींना पुणेरी पगडी घालून केले स्वागत

हेही वाचा – “जगतापांनी सॅल्युट करून..” दिवंगत लक्ष्मण जगतापांची आठवण सांगताना देवेंद्र फडणवीसांचे डोळे भरून आले

काँग्रेसचे सहकार प्रदेश सरचिटणीस बळीराम डोळे म्हणाले, पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्पर्धा परीक्षार्थी शिष्टमंडळाची भेट घडवण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे, आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. येत्या काळात सकारात्मक तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation of congress with competitive examiners called off after eighteen hours in pune pune print news ccp 14 ssb