तयार पिठांमधील अग्रजहा एक महत्त्वाचा ब्रँड. एकोणीस वर्षांपूर्वी पुण्यातच टिळक रस्त्यावर हा ब्रँड लहान स्वरूपात सुरू झाला आणि काहीच वर्षांत त्याने मोठी मजल मारली. सध्या या ब्रँडची पुण्यात ४२ फ्रँचायझी दुकाने आहेत, शिवाय तीन संकेतस्थळांवरूनही त्यांची उत्पादने विकली जातात.

हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीत बाजारातून धान्य आणून ते गिरणीत नेऊन दळून घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे. धान्यापेक्षा तयार पिठे विकत आणणे अनेकांना अधिक सोयीचे वाटते. विशेषत: नेहमी न लागणारी पिठे आणि भाजण्या तयार घेण्याकडे प्रामुख्याने कल असतो. तयार पिठांच्या व्यवसायातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे ‘अग्रज फूड प्रोसेसर्स.’ पुण्यात टिळक रस्त्यावर १९९८ मध्ये लहानशा जागेत बाळकृष्ण व वैशाली थत्ते यांनी हा ब्रँड सुरू केला.

100-year-old Nagpur railway station witnesses many transformations
१०० वर्ष जुने नागपूरचे रेल्वेस्थानक अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
Unlocking the Secrets of Adolescence from 30,000-Year-Old Skeletons
३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
Loksatta kutuhal Founder of the Paleontological Institute
कुतूहल: पुराजीवविज्ञान संस्थेचे संस्थापक

तयार पिठांचा व्यवसाय हा काही थत्तेंचा मूळ व्यवसाय नव्हे. बाळकृष्ण थत्ते यांचे कुटुंब चिपळूणचे. त्यांचे आई-वडील शिक्षक. थत्तेंनी मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये पदविका प्राप्त करून तीन मोठय़ा कंपन्यांमध्ये नोकरी केली होती. १९८४ मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि ते फॅब्रिकेशन आणि सव्‍‌र्हिसिंगची कामे घेऊ लागले. किशोर फ्लोअर मिलचे चं. म. करंदीकर यांच्याबरोबर ते पीठ दळण्याच्या गिरण्या बनवू लागले. गिरणीची यंत्रे बनवतोस, मग स्वत:च पीठ दळून का विकत नाहीस, असे ते थत्तेंना नेहमी म्हणत. प्रथम थत्तेंनी आयुर्वेदिक औषधी दळण्याची यंत्रणा उभी केली आणि प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधी निर्मात्यांची उत्पादने ते दळून देऊ लागले. डास पळवण्याची अगरबत्ती बनवणाऱ्या कंपनीलाही ते मिश्रण दळून देत. एकीकडे ही कामे सुरू असताना यंत्रनिर्मितीचे (फॅब्रिकेशन) काम सुरूच होते. करंदीकरांच्या प्रोत्साहनाने थत्ते यांनी स्वत:चा पिठांचा व्यवसाय सुरू केला. कोणत्या पदार्थासाठी पीठ बारीक-जाड- कसे हवे, हे त्यांनी शिकून घेण्यास सुरुवात केली आणि टिळक रस्त्यावर महाराष्ट्र मंडळाच्या शेजारी भाडय़ाच्या जागेत त्यांचे लहानसे दुकान सुरू झाले.

एकूण तयार पिठांचा व्यवसाय त्या काळी आजच्याइतका मोठा झाला नव्हता, परंतु थत्तेंच्या आधीपासून सहस्रबुद्धे यांची ‘सकस’ पिठे बाजारात आहेत. पिठांना असलेली मागणी हळूहळू वाढत चालली होती. व्यावसायिकांमध्ये स्पर्धा असली तरी ती निरोगी स्पर्धा होती, असे थत्ते नमूद करतात. थत्ते, सहस्रबुद्धे, राजमाचीकर गिरणीवाले यांचा व्यवसाय एकच, पण सगळे प्रसंगी एकमेकांच्या मदतीला धावून जात, असे थत्ते सांगतात.

तयार पिठांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी थत्ते यांनी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात पिंजून काढला आहे.  कधी व कुठे काय चांगले मिळेल हे त्यांना पक्के ठाऊक आहे. यासाठी त्या-त्या ठिकाणच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाची त्यांना मदत झाली. या मंडळाचे समाजाच्या सर्व स्तरांत सभासद आहेत. चांगला माल कोण पुरवू शकेल हे पाहून देण्यासाठी हे सभासद पुढे आले. त्यातून राजस्थानमधून सोयाबीन, गुजरातमधून गहू, मध्य प्रदेशमधून डाळ असा ठिकठिकाणहून कच्चा माल थत्तेंकडे येतो. कणीक, थालिपीठ भाजणी, उपवास भाजणी डाळीचे पीठ, ज्वारीचे पीठ, नाचणी पीठ, मेतकूट ही ‘अग्रज’ची उत्पादने कायम लोकप्रिय राहिली. ‘पौष्टिक’ या ‘ब्रँड’ नावाने ते ही उत्पादने बनवतात. ‘आरोग्यम् धनसंपदा’ नावाचा एक नवा ब्रँड देखील ते विकसित करत आहेत.

‘अग्रज’चे मूळ दुकान टिळक रस्त्यावर आहे, परंतु पुण्यात आपली शंभर ‘फ्रँचायझी’ दुकाने उघडली गेली पाहिजेत असे थत्ते यांचे पहिल्यापासून स्वप्न होते. ‘अग्रज’ची फ्रँचायझी सुरू करण्यासाठी कुणीही आले, तरी मी त्यांना एकच प्रश्न विचारतो. ३६५ दिवस काम करण्याची तयारी आहे का?.. एखादा अपवाद वगळता आम्ही सुट्टी घेत नाही आणि फ्रँचायझीसाठीही ती अट घालतो. त्यांच्याकडून आम्ही कसलीही ठेव रक्कम घेत नाही,’ असे थत्ते सांगतात. आता मुंबईत पाच ठिकाणी त्यांच्या फ्रँचायझी सुरू होत आहेत, तसेच तीन संकेतस्थळांच्या माध्यमातूनही ‘अग्रज’ची उत्पादने विकली जातात. अद्याप त्यांनी निर्यात मात्र सुरू केलेली नाही.

इतर उत्पादकांचीही उत्पादने ‘अग्रज’च्या दुकानात मिळतात. कणकेच्या गव्हल्यांपासून केळ्याच्या अंडेविरहित केकपर्यंत त्यांच्याकडे ग्राहकाला काय नवे सापडेल, याची कल्पनाही करता येत नाही. असे असले तरी थत्ते येईल ते उत्पादन आपल्या दुकानात ठेवतात असे नाही. ‘एखाद्या नव्या उत्पादनाविषयी शंका आली तर मी प्रयोगशाळेत स्वखर्चाने त्याची चाचणी करून घेतो. आपण जे विक्रीस ठेवू त्याची आपल्याला नीट माहिती हवी, असे मला वाटते. एकदा एका उत्पादकाच्या ‘साजूक तुपाच्या’ चिरोटय़ांमध्ये चरबी असल्याचे मला आढळले होते, तर एका पुरवठादाराच्या खजुराला वंगणाने पॉलिश केलेले आढळले. उत्पादकांच्या कारखान्यालाही मी भेट देतो,’ असे थत्ते आवर्जून सांगतात.

sampada.sovani@expressindia.com

Story img Loader