पुणे : यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ४४.५६ लाख टन रासायनिक खतांचा साठा मंजूर केला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यात २९.१९ लाख टन खतांचा साठा होता. उर्वरित खतांचा पुरवठा केंद्राकडून होणार आहे. हंगामात खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी कृषी विभागाने काटेकोर नियोजन केले आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कृषी विभागाने खरीप हंगाम २०२४ साठी ४८ लाख टन खतांचा प्रस्ताव दिला होता, त्यापैकी ४५.५३ लाख टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. ४५.५३ लाख टनांमध्ये युरिया १३.७३ लाख नट, डीएपी ५ लाख टन, एमओपी १.३० लाख टन, संयुक्त खते १८ लाख टन आणि ७.५० लाख टन एसएसपी खतांचा समावेश आहे.

navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
50 percent vacancies in FDA, FDA, drug licensing,
‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम

हेही वाचा : केरळमध्ये कधी दाखल होणार मोसमी वारे? हवामान विभागाने दिली माहिती…

मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यात २९.१९ लाख टन खतांचा साठा होता. त्यात ८.९८ लाख टन युरिया, १.५२ लाख टन डीएपी, ०.७२ लाख टन एमओपी, १२.१९ लाख टन संयुक्त खते आणि ४.९८ लाख टन एसएसपी खतांचा समावेश आहे.

वर्षाला ६५ लाख टनांची गरज

राज्याला एका वर्षाला सरासरी ६५ लाख टन रासायनिक खतांची गरज असते. त्यापैकी खरीप हंगामात सरासरी ३८ लाख टन आणि रब्बीत २७ लाख टन खतांचा वापर होतो. मागील पाच वर्षांतील सरासरीचा विचार करता, २०१९-२० मध्ये ६१.३३ लाख टन, २०२०-२१ मध्ये ७३.६७ लाख टन, २०२१-२२ मध्ये ७०.६७ लाख टन, २०२२-२३ मध्ये ६४.७३ लाख टन आणि २०२३-२४ मध्ये ६४.५७ लाख टन खतांचा वापर करण्यात आला होता.

हेही वाचा : पिंपरी: पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात शरद पवार गटाचे आंदोलन

खतांच्या मागणीत वाढ का ?

राज्यासह देशभरात सेंद्रीय, जैविक खतांच्या वापराला चालना दिली जात आहे. त्यासाठी विविध योजनाही राबविल्या जात आहेत. पण, प्रत्यक्षात रासायनिक खतांच्या वापरात दिवसोंदिवस वाढच होत आहे. राज्यात फुले, पालेभाज्या, फळभाज्यांसह विविध प्रकारच्या फळांची, नगदी पिकांची शेती केली जाते. त्यासाठी शेतकरी रासायनिक खतांच्या वापराला प्राधान्य देतात. वर्षांनुवर्षांच्या शेती उत्पादनांमुळे जमिनीचा कस कमी होत आहे. जनावरांची संख्या घटल्यामुळे शेणखताचा वापर घटला आहे. सेंद्रीय, जैविक खतांच्या वापराला मर्यादा आहेत. त्यामुळे राज्यात रासायनिक खतांचा वापर वाढत आहे, अशी माहिती खत उद्योगाचे अभ्यासक विजयराव पाटील यांनी दिली.

हेही वाचा : १४५ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणातील फरारी आरोपी हैद्राबादमधून गजाआड; १७ वर्ष ओळख लपवून वास्तव्य

काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई

राज्यात खरीप हंगामासाठी पुरेशा खतांची उपलब्धता आहे. हंगामात खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार होऊ नये, यासाठी कृषी विभाग सतर्क आहे. सरकारने ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त दराने खत विक्री केल्याचे आढळून आल्यास. काळाबाजार होत असल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क करावा, असे अवाहन कृषी विभागाचे निविष्ठा व गुण नियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी केले आहे.

Story img Loader