पुणे : पावसाळ्यात २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेल्या मंडलांतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविमा योजने अंतर्गत नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम दिवाळीपूर्वी जमा केली जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी दिली.

साखर संकुल येथे आयोजित रब्बी हंगामाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुंडे म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढलेल्या सर्व मंडलांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या निकषांप्रमाणे पंचवीस टक्के आगाऊ भरपाई देण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले आहेत. दिवाळीच्या आता भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सरकार प्रयत्नशील आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या निकषानुसार, एकवीसहून अधिक दिवस पावसाचा खंड असलेल्या भागातील लाभार्थी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के भरपाई दिली जाते. त्यानुसार अधिसूचित केलेल्या मंडलांमध्ये विमा देताना कंपन्यांना आक्षेप घेण्याच्या अधिकार आहे. मात्र, शेतकऱ्यांना पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित ठेवले जाणार नाही. काही विमा कंपन्यांचे आक्षेप विभागीय स्तरावर फेटाळण्यात आले असून, काही कंपन्यांनी आता कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अपील केले आहे. ते फेटाळल्यावर शेतकऱ्यांना आगाऊ भरपाई देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Congress Statistical Analysis Department head Praveen Chakraborty allegations regarding voter turnout Mumbai news
मतदारवाढ अनाकलनीय; काँग्रेसच्या सांख्यिकी विश्लेषण विभागाचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांचा आरोप
property tax defaulters in pune news in marathi
अभय योजनेचा फायदा घेणारेच झाले पुन्हा थकबाकीदार, नक्की प्रकार काय ?
Increase in ST fares after elections are over is fraud with poor people Vijay Vadettiwar criticizes
निवडणूक होताच एसटीची दरवाढ, ही गरीब जनतेची लूट; विजय वडेट्टीवार यांची टीका
Nmmc chief dr kailas shinde warn builders over pollution
नियम मोडणाऱ्या बिल्डरांच्या परवानग्या रद्द; महापालिका प्रशासनाचा इशारा
Ratnagiri-Nagpur highway only after paying four times compensation says Rajendra Patil Yadravkar
चौपट भरपाई दिल्यावरच रत्नागिरी – नागपूर महामार्ग, राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा इशारा
Crop insurance one rupee, Crop insurance ,
एक रुपयात पीकविमा बंद? बोगस अर्ज, गैरव्यवहारांमुळे समितीची सरकारला शिफारस

हेही वाचा >>>बारामती लोकसभेत भाजपला यश मिळणार नाही, म्हणूनच… चंद्रशेखर बावनकुळे घाबरत आहेत- रोहित पवार

पीकविम्यातील गैरप्रकारांना आळा घालणार

राज्यात पाऊस नसतानाही, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्रातील पर्जन्यमापकामध्ये पाणी ओतून आपत्कालीन पीक विमा योजनेची भरपाई लाटण्याच्या प्रकार घडला. गृह विभागामार्फत या घटनेचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. पंतप्रधान पीक विमा योजनेतील गैरप्रकारांची नोंद घेण्यात येत असून, शेतकरी असल्याचे भासवून, इतरांच्या शेतजमिनी स्वत:च्या नावे दाखवून पीक विम्याची भरपाई लाटण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही मुंडे म्हणाले.

हेही वाचा >>>“बालेकिल्ला कुठल्या एका नेत्याचा नसतो”, रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

रब्बी हंगामाची तयारी पूर्ण

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते, पीककर्जाची अडचण भासणार नाही. यंदा आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष घोषित असल्याने, रब्बी हंगामात उत्पादीत होणाऱ्या तृणधान्यांना चांगला भाव मिळवून दिला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Story img Loader