पुणे : देशात सर्वाधिक परवडणारी घरे यंदा गुजरातमधील अहमदाबाद शहरात आहेत. त्याखालोखाल पुण्याचा दुसऱ्या क्रमांक असून, मुंबईतील घरे महाग असल्याने या शहराचा शेवटचा क्रमांक लागला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
घरगुती उत्पन्नाच्या तुलनेत गृहकर्जाच्या मासिक हप्याच्या गुणोत्तरावरून परवडणारी घरे असलेल्या शहरांची क्रमवारी नाइट फ्रँक इंडियाने जाहीर केली आहे. यात देशातील मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. यानुसार, देशात सर्वाधिक परवडणारी घरे अहमदाबादमध्ये आहेत. तिथे घरगुती उत्पन्नाच्या तुलनेत गृहकर्जाच्या मासिक हप्त्याचे प्रमाण २० टक्के आहे. यात पुणे दुसऱ्या आणि कोलकाता तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तिथे घरगुती उत्पन्नाच्या तुलनेत गृहकर्जाच्या मासिक हप्त्याचे प्रमाण अनुकमे २३ टक्के आणि २४ टक्के आहे.
आणखी वाचा-वाहनचालकांच्या खिशाला झळ! सीएनजी दरवाढीचा पुन्हा दणका
देशात परवडणाऱ्या घरांमध्ये मुंबईचे स्थान शेवटचे आहे. मुंबईत घरगुती उत्पन्नाच्या तुलनेत गृहकर्जाचे प्रमाण ५० टक्के आहे. घरगुती उत्पन्नाच्या तुलनेत मासिक हप्त्याचे प्रमाण जेवढे कमी असेल, तेवढी घरे जास्त परवडणारी असतात. मुंबईतील घरे परवडण्याच्या बाबतीत काठावर आहेत. परवडणाऱ्या घरांमध्ये चेन्नई चौथ्या स्थानी, बंगळुरू व दिल्ली संयुक्तपणे पाचव्या स्थानी आणि हैदराबाद सहाव्या स्थानी आहे. या चारही शहरांमध्ये घरगुती उत्पन्नाच्या तुलनेत गृहकर्जाच्या मासिक हप्त्याचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
परवडणारी घरे कशी ठरवितात?
परवडणारी घरे ठरविताना त्या शहरातील घरांची सरासरी किंमत विचारात घेतली जाते. त्यातील ८० टक्के गृहकर्ज रक्कम आणि कर्जाची मुदत २० वर्षे धरून मासिक हप्ता निश्चित केला जातो. त्या शहरात एका कुटुंबाला सरासरी घरगुती उत्पन्नापैकी किती टक्के रक्कम मासिक हप्त्यासाठी द्यावी लागते, त्यावरून परवडणारी घरे ठरविली जातात. सर्वसाधारणपणे उत्पन्नाच्या तुलनेत गृहकर्जाचा मासिक हप्ता ४० टक्के असावा. हा हप्ता उत्पन्नाच्या तुलनेत ५० टक्क्यांवर गेल्यास बँकाही गृहकर्ज देत नाहीत.
आणखी वाचा-अपघातानंतर मित्र पसार, गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू; बिबवेवाडी भागातील घटना
देशात घरांची मागणी कायम राहण्यास आणि विक्रीत वाढ होण्यास घरे परवडणारी असणे हा अतिशय महत्त्वाचा घटक ठरतो. देशात घरांच्या किमतीत वाढ होत असली, तरी उत्पन्नातही वाढ होत असल्याने घरे परवडणारी ठरत आहेत. पुढील वर्षीही परवडणाऱ्या घरांची पातळी कायम राहील. -शिशीर बैजल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया