पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत ५ हजार ५००हून अधिक संस्थांना मान्यता देण्यात आली आहे. मात्र, शिक्षण संस्थांना नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून, आता विलंब शुल्क भरून १६ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. एआयसीटीईने संस्था नोंदणीसाठी वारंवार मुदतवाढ दिल्याचे दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : पालखी सोहळ्यात चोरट्यांचा उच्छाद

बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए अभ्यासक्रम यंदा एआयसीटीईने आपल्या अखत्यारित घेतले. तसेच हे अभ्यासक्रम चालवण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांना नोंदणी करून मान्यता घेणे बंधनकारक केले. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२४साठी संस्था नोंदणी, मान्यता प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये सुरू करण्यात आली. २ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या नोटिशींमध्ये ४ हजार २०० संस्थांना मान्यता देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतरही नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली.

हेही वाचा >>> लोणावळ्यात गेल्या २४ तासात कोसळला तब्बल १३६ मिलिमीटर पाऊस

एआयसीटीईने २८ जून रोजी नोंदणीसाठी मुदतवाढ दिल्याची नोटिस प्रसिद्ध केली. त्यानुसार आतापर्यंत ५ हजार ५०० पेक्षा जास्त संस्थांना ‘जसे आहे तसे’ तत्त्वावर संस्थांना मान्यता दिली आहे. मात्र संस्थांच्या विनंतीनुसार नोंदणीसाठी पुन्हा संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत नोंदणी न केलेल्या संस्थांना १५ जुलैपर्यंत पाच हजार रुपये विलंब शुल्क भरून नोंदणी करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

उच्च शिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखाली राज्यातील प्रवेश राज्यात बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी सीईटी सेलद्वारे प्रवेश परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला कमी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तसेच अनेक विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाणार आहे. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया उच्च शिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखाली सीईटी सेलद्वारे राबवली जाणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aicte council approved more than 5 thousand 500 institutes for bba and bca courses pune print news ccp 14 zws