पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) देशभरातील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठीची अंतिम मुदत वाढवली आहे. त्यामुळे आता महाविद्यालये, विद्यापीठांतील रिक्त असलेल्या जागांवर विद्यार्थ्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.

हेही वाचा >>> खेळाडू आरक्षणाचा लाभ देण्याच्या तरतुदीमध्ये बदल

Three days holiday in school
तीन दिवसांची सुट्टी! मतदानावर काय परिणाम…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
preliminary round of loksatta lokankika one act play competition
 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली घंटा; प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून; मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
three days holiday to all schools
निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुटी? शिक्षण विभागाच्या सूचना काय?
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Today is the last day to apply for various courses of Idol Mumbai print news
‘आयडॉल’च्या विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

एआयसीटीईने प्रवेशाच्या अंतिम मुदतीबाबत बदल करून सुधारित शैक्षणिक वेळापत्रक प्रसिद्ध केले. एआयसीटीईच्या आधीच्या वेळापत्रकानुसार तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठीची अंतिम मुदत १५ सप्टेंबर होती. मात्र उत्तरेकडील पंजाबसह राज्यांमध्ये उद्भवलेली पूर परिस्थिती, मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला नव्हता. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार एआयसीटीईने प्रवेशासाठीची अंतिम मुदत वाढवली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या रिक्त असलेल्या जागांवर ३० ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठांच्या संलग्नतेसाठीही ३० ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे.