लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी: पर्यावरणाचा ऱ्हास आणि शहरातील प्रदूषण कमी करण्यावर महापालिकेचा भर असून, २०२६ पर्यंत शहरात किमान ५० टक्के ई-रिक्षांचा वापर करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

सद्यःस्थितीत शहरात ई-वाहनांची संख्या सुमारे ११ टक्के आहे. पर्यावरणपूरक वाहनांसाठी पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्ही) सेल स्थापन करण्यात आला आहे. त्याअंतर्गत तीनचाकी ई-वाहनांच्या वापराला गती देण्याच्या उद्देशाने उद्योग व वाहन संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत नुकतीच बैठक झाली. त्यात ईव्ही सेलने सीएनजीवरील रिक्षांच्या तुलनेत ई-रिक्षा चालविण्याचे फायदे आणि रिक्षाचालक-मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांचे विविध प्रकार, तंत्रज्ञान व अर्थकारणाची माहिती देण्यात आली.

आणखी वाचा- पुणे: ई-वाहनांची विक्री सुसाट; चालू वर्षात दुचाकी, तीन चाकींची ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी

अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी महापालिकेच्या पर्यावरण, विद्युत, बांधकाम परवानगी विभागांच्या धोरणांची माहिती दिली. माणदेशी महिला सहकारी बँकेच्या संस्थापक अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी शहरातील महिला ऑटो रिक्षाचालकांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aim to use 50 percent of e rickshaws in pimpri by 2026 pune print news ggy 03 mrj
Show comments