लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: देशांतर्गत हवाई वाहतुकीला करोना संकटाच्या काळात मोठा फटका बसला होता. विमान प्रवाशी संख्येत मोठी घट नोंदवण्यात आली होती. एप्रिलमध्ये ही संख्या करोना संकटापूर्वीच्या पातळीवर पोहोचली आहे. एप्रिलमध्ये देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या १ कोटी २८ लाखांवर गेली आहे.
नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने एप्रिलमधील देशांर्तगत हवाई वाहतूक क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, करोना संकटाच्या काळात एप्रिल २०१९ मध्ये देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या १ कोटी १० लाख होती. ती यंदा एप्रिलमध्ये २२ टक्क्याने वाढू १ कोटी २८ लाखांवर पोहोचली आहे. परंतु, यंदाच्या मार्चच्या तुलनेत प्रवासी संख्येत एप्रिलमध्ये किंचित घट नोंदवण्यात आली आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावधीतील एकूण विमान प्रवाशांची संख्या ५ कोटी ३ लाखांवर पोहोचली आहे. मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत यात ४२.८८ टक्के वाढ झाली आहे.
आणखी वाचा-कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारक दर्जासाठी २०१८ मध्येच प्रस्ताव
देशांतर्गत हवाई वाहतुकीत इंडिगो कंपनीचा सर्वाधिक ५७.५ टक्के हिस्सा आहे. कंपनीच्या प्रवाशांची संख्या एप्रिलमध्ये ७४ लाख आहे. हवाई वाहतूक बाजारपेठेतील कंपनीच्या हिश्श्यात १.३ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. दुसऱ्या स्थानी विस्तारा कंपनी असून, तिच्या प्रवाशांची संख्या ११.२ लाख आहे. या कंपनीचा बाजारपेठेतील हिस्सा ८.७ टक्के आहे. एअर इंडिया ११.१ लाख प्रवाशांसह तिसऱ्या स्थानी असून, तिचा बाजारपेठेतील हिस्सा ८.६ टक्के आहे.
विमाने रद्द होण्याची कारणे (आकडे टक्क्यांत)
कामकाज : ४३.५
तांत्रिक : ३६.१
हवामान : १३.५
व्यावसायिक : २.६
इतर : ४.३