भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने चिंचवड पोटनिवडणूक लागली आहे. चिंचवड पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडीकडून नाना उर्फ विठ्ठल काटे, भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप आणि बंडखोर राहुल कलाटे रिंगणात उतरले आहेत. प्रचार देखील सुरू झाला असून उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची कन्या ऐश्वर्या रेणुसे (जगताप) ही तिच्या आईसाठी रणरागिणी प्रमाणे प्रचाराचे काम करत आहे. स्वतः कोपरा सभा घेत असून आई अश्विनी जगताप यांना निवडून देण्याचे आवाहन जनतेला करत आहे. सहानुभूती म्हणून नाही तर दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी भरगोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन त्या मतदारांना करत आहेत. त्यांच्या पाठबळाचे सध्या सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- उमेदवार राहिला बाजूला, स्वतःच्याच पक्षाचा केला प्रचार, पोटनिवडणुकीतील खमंग चर्चा, वाचा कुठे झालं हे….

भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे तीन जानेवारी रोजी कर्करोगाशी झुंज देत असताना निधन झाले. अवघ्या पंधरा दिवसानंतर चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लागली. आमदारांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली. प्रचार सुरू झाला असून मुलगी ऐश्वर्या आई अश्विनी ला निवडून आणण्यासाठी रणरागिणी सारखी दिवसरात्र प्रचाराचे काम करत आहे. दिवंगत आमदार यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. ऐश्वर्या म्हणाली की, लोकसेवा करण्यासाठी या पोटनिवडणूकीत आम्हाला निवडून द्या. तुम्ही सर्व माझ्या वडिलांना भाऊ म्हणायचा, आज ते आपल्यात नाहीत. ते नेहमी जनेतच्या पाठीशी राहिले आहेत. आज आम्हाला तुमच्या पाठबळाची गरज आहे. तुम्ही खंबीर पाठिंबा द्या. भाऊंचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. ही निवडणूक सहानुभूती ची नाही तर स्वप्नपूर्ती करण्यासाठी ची आहे हे तुम्ही दाखवून द्या. असे आवाहन ऐश्वर्या हिने केले. भाऊंना (दिवंगत आमदार) कर्करोग आहे म्हणून ते कधी खचले नाहीत. उलट ते म्हणायचे मी लवकरच बरा होईल. मला काही होणार नाही. त्यांच्यात प्रबळ इच्छाशक्ती होती. डॉक्टरांनी आम्हाला सांगितले होते की ते सहा महिने जगतील मात्र त्याच्या इच्छाशक्ती च्या बळावर हसतखेळत त्यांनी दोन वर्षे काढली. ते कधीच मलाच का कर्करोग झाला म्हणून रडले नाहीत. असे ऐश्वर्या म्हणाली.

हेही वाचा- घोटाळेबाज नीरव मोदीच्या पुण्यातील फ्लॅटला ग्राहकच मिळेना; पुन्हा होणार लिलाव, कर्ज आणि फ्लॅटची रक्कम किती?

पुढे ती म्हणाली की, त्यांचे निधन होण्याच्या एक दिवस अगोदर ज्या अतिदक्षता विभागात भाऊ (दिवंगत आमदार) हे उपचार घेत होते. तिथे एका अपघातग्रस्त तरुणाला आणले, तो ओरडत होता मला इथे कशाला आणले. मला खर्च परवडणार नाही. हे ऐकुन वडिलांनी आमदार निधी मधून त्याचा खर्च केला. अशा आठवणी ऐश्वर्या नागरिकांना सांगत असून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई अश्विनी लक्ष्मण जगताप यांना निवडणूक देण्याचे आवाहन करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya jagtap participated in campaign rally with photo of laxman jagtap to promote her mother in chinchwad by election kjp dpj