महापालिका निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या, तसतसे शहरातील राजकीय घडामोडी वेगवान होऊ लागल्या आहेत. विकासकामांचा मुद्दा घेऊन आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याच्या तयारीत असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शनिवारी (१४ मे) पिंपरी-चिंचवड दौरा असून या निमित्ताने विविध कामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीच्या वतीने निवडणुकांसाठी वातावरण निर्मिती करण्याची जोरदार तयारी सुरू आहे.
शनिवारी सकाळी दहापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत विविध कामांचा प्रारंभ करण्यासाठी अजितदादा शहरात येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी महापालिकेच्या वतीने सुरू आहे. दापोडी व बोपोडीला जोडणाऱ्या हॅरिस ब्रीजला समांतर पूल उभारण्यात येणार असून त्याचा प्रारंभ शनिवारी होणार आहे. याशिवाय, संभाजीनगर येथे आधुनिक पध्दतीचे बस स्टॉप, प्राणीसंग्रहालयाचे नूतनीकरण, बाह्य़ रुग्ण विभागाचे उद्घाटन, थेरगाव-लक्ष्मीनगर ‘सब-वे’ चे उद्घाटन, पाण्याच्या टाकीचे उद्घाटन, काळेवाडीतील शाळा इमारतीचे उद्घाटन, सांगवीत ‘मॉडेल वॉर्ड’ पध्दतीने विविध कामांचा प्रारंभ, स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात येत आहे. सांगवी येथे उभारण्यात येणाऱ्या शहरातील पहिल्या ‘वेस्ट टू कंपोस्ट’ या पाच टन क्षमतेच्या प्रकल्पाचे उद्घाटन करून जाहीर सभेद्वारे समारोप करण्यात येणार आहे. ज्या भागात अजितदादांचे कार्यक्रम होणार आहेत, त्या भागात वातावरणनिर्मिती करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा