पिपंरी : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात गणपती मंडळांना भेटी देण्याचा सपाटा सर्व पक्षीय नेत्यांचा सुरू आहे. आज माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मनसेचे अमित ठाकरे हे पिंपरी-चिंचवड शहरातील गणपती मंडळांना भेट देणार आहेत. अजित पवार हे दुपारी दोन पासून तर अमित ठाकरे हे चार वाजल्यापासून गणपती मंडळाची भेट घेणार आहेत. 

हेही वाचा… पुणे : विसर्जन मिरवणुकीसाठी साडेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त ; विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

हेही वाचा… पुणे : गणेश विसर्जनासाठी महापालिकेची तयारी पूर्ण

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणण्यासाठी पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे. महानगर पालिकेच्या निवडणूका जाहीर झाला नसल्या तरी राजकीय नेत्यांचे दौरे आणि प्रचार सुरू झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मनसेचे अमित राज ठाकरे यांचा आज पिंपरी-चिंचवड दौरा आहे.त्यामुळं येणाऱ्या महानगरपालिकामध्ये गणपती बाप्पा कोणाला पावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader