पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित महायुतीच्या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठ फिरवली. आमदार माधुरी मिसाळ यांची अनुपस्थिती आणि चेतन तुपे यांची अल्प काळासाठीची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, ‘तिसरी बार मोदी सरकार, इसबार चारसो पार’ असा संकल्प करत आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्यासह राज्यातील सर्व ४८ जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीच्या मेळाव्यात रविवारी करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील चारही जागांवर महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा – पुणे महापालिकेचा मोठा निर्णय: खासगी रुग्णालयांसाठी सरकारी करोना चाचणी केंद्रे खुली

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय आणि मनोमिलन साधण्यासाठी भाजप, शिवसेना, अजित पवार गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), शिवसंग्राम आणि अन्य मित्रपक्षांचा जिल्ह्याचा पहिला संयुक्त मेळावा येत्या रविवारी झाला. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहरप्रमुख अजय भोसले आणि प्रमोद भानगिरे, रिपाइंचे शहराध्यक्ष परशुराम वाडेकर यांच्यासह तिन्ही पक्षाचे आमदार उपस्थित होते.

राजकीय विचारधारा काही असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विकासाची विचारधारा हाच भारताचा धर्म होईल. राजकीय इच्छाशक्ती आणि अपार कष्ट करायची ताकद इतर पक्षातील नेत्यांना भावत आहे. त्यामुळे मेळाव्याच्या निमित्ताने महायुती हाच आपला पक्ष आहे आणि महायुतीमधील तिन्ही पक्षांचे मनोमिलनाचा धागा कायम ठेवावा, असे आवाहन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

हेही वाच – बारा भारतीय भाषांत पाठ्यपुस्तके लिहिण्यासाठी युजीसी लेखकांच्या शोधात

आगामी निवडणुकीत बारामतीची जागा पडणार आहे. ती २०१४ ला जाणार होती. मात्र थोडक्यात घोटाळा झाला. या राज्याने दोन वर्षे ‘बसे’ मुख्यमंत्री पाहिले. तेलंगणातही असेच मुख्यमंत्री होते. लोकांनी त्यांना घरी बसविले. लोकांना काम करणारी सेना हवी आहे. अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमावर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. बहिष्कार टाकण्याशिवाय त्यांना दुसरे काही येत नाही. आगामी निवडणुकीत जनता त्यांच्यावर बहिष्कार टाकेल. निवडणुकीला शंभर दिवस राहिले आहेत. त्यामुळे महायुतीतील सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे. कामाचे नीट वाटप करून नव्याने वेळापत्रक तयार करा. पुणे लोकभेसाठी ७५ टक्के मतदान झाले पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न करा, अशी सूचना प्रकाश जावडेकर यांनी केली.

रामराजे निंबाळकर म्हणाले की, मोदींच्या कार्यशैलीमुळे सर्वजण एकत्र आले आहेत. १९७२ च्या दुष्काळात मिलो खाणारा देश पाच ट्रिलियन डाॅलरची अर्थव्यस्था होत आहे. याचे दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना आकर्षण आहे. राजकीय विचारधारा काही असली तरी मोदींची विकासाची विचारधारा हाच भारताचा धर्म होईल. राजकीय इच्छाशक्ती आणि अपार कष्ट करायची ताकद इतर पक्षातील नेत्यांना भावत आहे. त्यामुळे विजयाच्या हॅट्ट्रिकमध्ये येण्याचे भाग्य राष्ट्रवादीला मिळाले आहे. उगाच काही न करणारे नेतृत्व आता नाही. एकमेकांविषयीची कटुता दूर करण्याची संधी या मेळाव्यात आली आहे. पूर्वीच्या नेतृत्वाबद्दल काही बोलणार नाही, परंतु मोदीशिवाय पर्याय नाही. महायुतीतील पक्षांना काही तरी द्या, अशी मागणी होते. मात्र महायुती हाच आपला पक्ष अशी भावना असली पाहिजे. त्यासाठी मनोमिलनाचा धागा कायम ठेवला पाहिजे.