पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारतीचा स्लॅब कोसळून ५ कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या ५ कामगारांना श्रद्धांजली वाहिली. तसेच या मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. विशेष म्हणजे अजित पवार यांनी प्रशासनाला या अपघाताच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या. तसेच मृतांच्या कुटूंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. अजित पवार यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली. अन्य जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरू राहतील, याची दक्षता घेण्याचेही निर्देश दिले.

“अपघातातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल”

इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यांनी त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.

स्लॅबसाठी लोखंडाच्या सळ्यांची तयार केलेली जाळी कोसळून अपघात

पुणे वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम सुरु असणाऱ्या ठिकाणी ही दुर्घटना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. स्लॅबसाठी लोखंडाच्या सळ्यांची तयार केलेली जाळी कोसळून त्याखाली १० कामगार अडकले. यापैकी पाच जणांना बाहेर काढण्यात आलं. तर पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला.”

हेही वाचा : Budget 2022: महाराष्ट्रावर अन्यायाची केंद्र सरकारची परंपरा यंदाच्या अर्थसंकल्पातही कायम – अजित पवार

पुण्याचे महापौर मुलीधर मोहोळ यांनी रात्री साडेबाराच्या सुमारास ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. “येरवडा येथील शास्त्रीनगरच्या वाडिया बंगल्याजवळ इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅबची जाळी कोसळून काही लोक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून आपल्या पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून देवदूत पथकासह युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे,” असं महापौर ट्विटमध्ये म्हणाले.