पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत असून २०५४ मध्ये पुणे शहरापेक्षा पिंपरी-चिंचवड शहराची लाेकसंख्या वाढणार असल्याचा अहवाल अधिका-यांच्या समितीने दिला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.अजित पवार म्हणाले, ‘शहर झपाट्याने वाढत असल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. सद्यस्थितीत भामा आसखेड, आंद्रा, पवना धरणाचे पाणी आणले जात आहे. २०५४ मध्ये पुणे शहरापेक्षा पिंपरी-चिंचवड शहराची लाेकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे पाण्याची समस्या भेडसावणार आहे. त्यावेळी टाटा माेटर्सची धरणे पिण्याच्या पाण्यासाठी घ्यावी लागतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुबईप्रमाणे समुद्राचे खारे पाणी पिण्यायाेग्य करावे लागण्याची स्थिती येऊ शकते. लाेकसंख्या वाढत असताना लाेकांना पिण्यास पाणी देणे महत्वाचे आहे. त्यानंतर शेती, उद्याेगांना पाणी दिले जाईल. दुबईप्रमाणे समुद्राचे खारे पाणी पिण्यायाेग्य करावे लागण्याची स्थिती आली तर आश्चर्य वाटणार नाही. सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम हाेत नाही ताेपर्यंत वाहतूक काेंडीचा प्रश्न सुटणार नाही. लवकरच वर्तुळाकार रस्त्याच्या कामाला सुरूवात हाेणार आहे’.

‘शहराचा कायापालट कोणी केला, हे पिंपरी-चिंचवडकरांना माहिती आहे. मी सन १९९२ ला पिंपरी-चिंचवडचा खासदार झालाे. १९९२ ते २०१७ या कालावधीत शहराचा विकास केला. २५ वर्ष झाली, शहरातील प्रत्येक गाेष्ट मी लक्ष देऊन काम करत आहे. अधिका-यांसाेबत सातत्याने बैठका घेऊन चर्चेतून मार्ग काढत असताे. शेवटी आपण महायुतीमध्ये आहाेत. ज्याने चांगले केले, त्याला चांगले म्हणायचे शिका. एवढा कंजूषपणा दाखवू नका, असा टोला आमदार महेश लांडगे यांना लगविला. मी दिलदार आहे. ज्याने केले त्याला मी त्याचे श्रेय देताे. १५ ऑगस्ट २०१८ ला देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तालय सुरू केले. आता आयुक्तालयाची इमारत हाेत आहे. त्यासाठी मी कितीवेळा अधिका-यांसाेबत बैठक घेतल्या, किती प्रयत्न केले, हे पोलीस आयुक्तांना माहिती आहे. एकही नवीन जिल्हा जाहीर केला जाणार नाही. सध्या आहे ते व्यवस्थित चालले आहे. ज्यावेळेस वाटेल, त्यावेळेस सरकार निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.