पिंपरी : चांद्रयानऐवजी चंद्रकांत असे विधान करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चूक झाल्याचे सांगत माफी मागितली. उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना चूक झाली नाही पाहिजे. पण, कामाच्या व्यापात चुकलो, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना-भाजपा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदा पिंपरी-चिंचवड महापालिकेत आले होते. महापालिका अधिकाऱ्यांसोबत तब्बल तीन तास बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते.

हेही वाचा – नागपूर : गोसीखुर्द प्रकल्पांसाठी निधीची प्रतीक्षा संपेना

हेही वाचा – यवतमाळ: ऑटो उलटून १३ विद्यार्थी जखमी

चांद्रयान तीन चंद्रावर गेल्यावर प्रतिक्रिया देताना चांद्रयानऐवजी चंद्रकांत असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. ते विधान समाजमाध्यमावर ट्रेडिंग झाले होते. त्यानंतर अजित पवार यांनी आज चूक झाल्याचे सांगत माफी मागितली. उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना चूक व्हायला नको. पण, कामाच्या व्यापात चुकलो. त्याचा बाऊ केला. पण चूक झाली की माफी मागणारा मी कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारात मी हस्तक्षेप करत नाही. आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन काम करत आहोत, असेही ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar apologized for chandrakant statement pune print news ggy 03 ssb
Show comments