पुणे : शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे सहभागी झाल्यानंतर त्यांना तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीनंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले. त्यानंतर अजित पवार यांनी बैठकांचा धडका लावला आहे. येरवडा येथील नदी पुनर्जीवन प्रकल्पाची अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, आमदार सुनील टिंगरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, पुण्यातील नदी सुधार योजनेचे काम देशातील इतर अशा कामांच्या तुलनेत चांगले सुरू असून अहमदाबादनंतर पुण्यात नदी सुधार प्रकल्प राबविला जात आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Raj Thackeray Fatwa
“मुस्लीम समाजातील ‘त्या’ महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका”; मनसे नेत्याची मागणी!
west bengol
पश्चिम बंगालमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून जोडप्याला बेदम मारहाण, रस्त्यावरील ‘त्या’ कृत्यामुळे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचाही संताप!
rift within party over bjp s defeat in the lok sabha elections is being blamed on the social media department
समाजमाध्यम विभागाच्या कामगिरीवरून भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस
sanjay raut on obc maratha reservation issue
राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणावरून संघर्ष, संजय राऊतांनी स्पष्ट केली ठाकरे गटाची भूमिका; म्हणाले…
Action on fake Kunbi certificates All party meeting to decide on issues of OBC
खोट्या कुणबी प्रमाणपत्रांवर कारवाई; ओबीसींच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय बैठकीत निर्णय
grief of the families of Naxalites Extortion for education and family of Naxalites is suffering
गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या कुटुंबीयांची व्यथा! एकीकडे शिक्षणासाठी खंडणी तर दुसरीकडे…
MHADA Mumbai, patra chawl scheme 306 houses price hike, patra chawl scheme houses, patra chawl scheme 306 Home Winners , Maharashtra Housing and Area Development Authority,
पत्राचाळ योजनेतील ३०६ घरांच्या किमतीत वाढ? सात ते दहा लाखांनी वाढ प्रस्तावित; विजेत्यांवरील आर्थिक भार वाढणार
ajit pawar chhagan bhujbal unhappy
राज्यसभेच्या उमेदवारी वरून छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा; अजित पवार म्हणाले, “आमच्या जवळच्या काही मित्रांनी…”

नदी सुधार प्रकल्प पूर्ण झाल्यावर कशा पद्धतीने असेल हे जाणून घेण्यासाठी अजित पवार यांनी व्हर्च्युअल रिॲलिटी गॉगलचा वापर केला. त्यांनी अधिकार्‍यांकडून माहिती जाणून घेतली.

हेही वाचा – पिंपरीत ‘काका-पुतण्या’ समोरासमोर, अजित पवारांची रोहित पवारांवर टीका; म्हणाले..

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे राज्यातील अनेक भागांत सभा घेत आहेत. त्याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, आता मी पर्यावरणावर बोलतोय, मध्येच कशाला ते आणतो, असे म्हणत त्यांनी मनोज जरांगे यांच्याबाबत बोलण टाळले.

कंत्राटी भरतीवरून राज्य सरकारवर टीका होत आहे. त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, निर्णय चांगला होता पण विरोधकांनी जाणीवपूर्वक त्याचा प्रपोगंडा केला असून युवकांमध्ये गैरसमज पसरवण्यात आला आहे. नोकऱ्या मिळणार नाही, नोकर्‍या जाणार, अशा शब्दात विरोधकांना त्यांनी सुनावले.

हेही वाचा – पिंपरी- चिंचवडमध्ये अजित पवारांच्या कार्यक्रमाला नाट्यगृह निम्मे रिकामे?

म्हणून पाहणी दौरा लवकर घेतला : अजित पवार

उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार हे आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास येरवडा येथील नदी पुनर्जीवन प्रकल्पाची पाहणी करण्यास येणार असल्याने त्यापूर्वीच महापालिका आयुक्त विक्रम कुमार, नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह सर्व यंत्रणा सज्ज होती. एवढ्या सकाळी पाहणी दौर्‍याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, मी येणार म्हटल्यावर पोलीस, प्रशासनामधील सर्व अधिकारी, तसेच आमच्या ताफ्यातील गाड्या यामुळे नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना आपल्यामुळे त्रास होऊ नये त्याकरिता लवकर पाहणी दौरा केला.