बारामती : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका आता सर्वपक्षीय नेत्यांना बसण्यास सुरुवात झाली आहे. मराठा क्रांती मोर्चाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कराखान्याच्या मोळी पूजनाला येण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. अजित पवार यांना या कार्यक्रमाला बोलावू नका. आम्ही त्यांना येथे पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी या प्रकरणी घेतली आहे. यामुळे पवारांना स्वतःच्याच बालेकिल्ल्यात येण्याला अटकाव निर्माण झाला आहे.

अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सुरुवात उसाची मोळी टाकून करू नये, असा इशारा  लेखी निवेदनाद्वारे माळेगाव साखर कारखान्याचे प्रशासनाला आणि माळेगावच्या पोलीस ठाण्याला मराठी क्रांती मोर्चाने दिला आहे.

district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Farmers halted auctions in Lasalgaon demanding immediate cancellation of onion export duty
निर्यात शुल्कविरोधात कांदा उत्पादक आक्रमक, लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले
cm devendra fadnavis address party workers at bjp state convention
सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह ठरेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन
from former Chief Minister Prithviraj Chavan Question over responsible for the extortion cases in the state
राज्यातील खंडणीच्या प्रकारांना मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हे तर कोण जबाबदार ? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज
bachu kadu criticized government over farmers suicide
“मरणारा शेतकरी हिंदू नाही का?”, बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक; अमरावतीत मोर्चा
sugar factories Bramhapuri , Vijay Wadettiwar,
चंद्रपूर : ब्रम्हपुरी परिसरात लवकरच पाच साखर कारखाने, आमदार विजय वडेट्टीवार यांची माहिती

हेही वाचा… PM Narendra Modi Shirdi Visit Live : “माझं आजोळ नगर जिल्हा, मला आठवतंय, ५३ वर्षे कितीतरी वेळा…”; अजित पवारांचा जुन्या राज्यकर्त्यांवर हल्लाबोल

शनिवारी (२८ ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ  आयोजित करण्यात आल्यावर मराठा आरक्षणासाठी आता संपूर्ण मराठा समाजच तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांडे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षण मिळविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बारामतीत प्रवेशबंदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. पवार यांच्या हस्ते मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ केल्यास संपूर्ण मराठा समाज एकत्र येऊन कारखान्यावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, या आंदोलनाची जबाबदारी कारखाना प्रशासनाकडे असेल अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या  आंदोलकांनी निवेदनातून नमूद केले आहे. मराठा क्रांती मोर्चाने दिलेल्या या इशाऱ्यामुळे बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे प्रशासक आता पेचात पडले आहेत.

हेही वाचा… “मोदी निळवंडे धरणाचं जलपुजन करत असताना आम्हाला सांगत होते की, बाबांनो…”; अजित पवारांनी सांगितला तो संवाद

दरम्यान, बारामती तालुक्यातील पंणदरे आणि सोमेश्वरनगर येथे अजित पवार यांच्या सभेत आरक्षणाबाबत जाब विचारून गोंधळ घातला गेल्याची घटना घडल्या होत्या. त्यामुळे मराठा समाजाचा नाराजीचा फटका पवार यांना बसू शकतो, असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे, यामुळे गळीत हंगामाचा शुभारंभ वादात सापडला असून बारामती तालुक्यातील  माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर गळीत  हंगाम शुभारंभात  कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा  सतर्क झाली आहे.

Story img Loader