चिंचवड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा आणि लोकसभा महायुतीतर्फे लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे, असे वक्तव्य देखील अजित पवार यांनी केले आहे. ते चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. अजित पवार हे आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच पिंपरी- चिंचवड शहरात आले होते. त्यांचं मोठ्या उत्साहात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, विलास लांडे, संजोग वाघेरे यांच्यासह इतर पदाधिकारी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, ‘विधानसभा आणि लोकसभा आपण महायुतीतर्फे लढणार आहोत. आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे. महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच काय? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण येईल. या पूर्वी काँग्रेस पक्षासोबत आघाडी होती ती परिस्थिती राहील, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्या- त्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, शहरातील नेत्यांनी आणि नागरिकांनी ठरवायचं की युती करायची की एकट्याच्या ताकदीवर लढायचं. निवडून येणार असाल अशी खात्री असेल तर तुम्ही युती करू नका. मतांची विभागणी न होता युती केली पाहिजे, तर युती करा, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा : नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण असणार? जनतेने कोणाला दिली पसंती? महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याचाही समावेश

आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही – अजित पवार

आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही. मला सत्कारावेळी अनेकांनी सर्व महापुरुषांशी निगडीत वस्तू दिल्या, त्या मी घेतल्या. जर त्या घेतल्या नाही तर म्हणणार काय हा उपमुख्यमंत्री झाला तर काय नाटकं करतोय, किती ताटलाय असं म्हणणार? सांगायचं तात्पर्य हे की आम्ही भाजप आणि शिंदे गटाच्या सत्तेत सहभागी झालोय. पण आम्ही आमची विचारधारा सोडली नाही. सर्व- धर्म समभाव हीच आमची विचारधारा आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar claims ncp symbol and party says upcoming loksabha elections to be faced with bjp and shivsena pune print news kjp 91 css
Show comments