पुणे : दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त ठरलेल्या २०१९ साली घडलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार शपथविधीसाठी आले होते, असा खुलासा त्यांनी केला. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, “मी कोणाशी बोलायचे तो माझा अधिकार”, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ येथील कार्यक्रमासाठी आले होते. येथे त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले होत फडणवीस?
शरद पवार यांच्याबरोबर चर्चा करूनच अजित पवार यांच्याबरोबर शपथविधी झाला होता, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीही त्यासंदर्भात तातडीने प्रतिक्रिया दिली होती. या गौप्यस्फोटासंदर्भात फडणवीस यांच्याकडे विचारणा केली असता एक सत्य सांगितले आहे, उर्वरीत सत्य वेळ आल्यावर नक्की सांगेन, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – पुणे : खासदार गिरीश बापट प्रचारात सक्रिय, केसरीवाड्यात कार्यकर्ता मेळावा
राजकीय वर्तुळात चर्चा
मी अजून आर्धच सांगितले – फडणवीस
शरद पवार आणि पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या गौप्यस्फोटाबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, मी अजून अर्धच बोललो आहे. दुसरी योग्य वेळ आल्यास उरलेले जे काही आहे ते सांगेन, असे विधान त्यांनी केले. त्यामुळे येत्या काळात अजून कोणते खुलासे फडणवीस करतील आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.