पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश बोसले यांना सीबीआयने गुरुवारी (२६ मे) अटक केली. त्यांच्यावर येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. त्यांनी या गैरव्यवहारातील रक्कम इतरत्र वळवली असा त्यांच्यावर आरोप आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

अजित पवार म्हणाले, “अविनाश भोसले यांना का अटक केली याची मला माहिती नाही. मी सीबीआयला विचारायला जाऊ का? सीबीआय, ईडी या वेगवेगळ्या यंत्रणांना काही माहिती मिळाली तर ते चौकशी करण्यासाठी तुम्हाला बोलावू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे मला अविनाश भोसले यांच्या प्रकरणातील काही माहितीच नाही, तर मी त्यावर काय उत्तर देणार आहे.”

Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’

आर्यन खानला एनसीबीने दिलेल्या क्लीन चिटवर बोलताना अजित पवार म्हणाले, “आज त्या तरूण मुलाचं वय किती? त्याच्या आयुष्यातील काही दिवस वाया गेले. त्याला त्यावेळी कितीदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं. शाहरुख खानचं कुटुंब डिस्टर्ब झालं होतं. स्वतः शाहरूख त्याचं कुठंतरी शुटिंग सुरू होतं ते सोडून दिलं.”

“केंद्राच्या काही चौकशी करणाऱ्या यंत्रणा आहेत, राज्याच्या काही चौकशी करणाऱ्या यंत्रणा आहेत. त्यामुळे कागदपत्रे आणि माहिती मिळाली तर चौकशी केली पाहिजे. कारण तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, त्यातून निष्पाप लोकांना अडकवलं जाऊ नये, अशी साधारण सर्वच नागरिकांची इच्छा असते,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

अविनाश भोसले यांचं नेमकं प्रकरण काय?

अविनाश भोसले यांच्यावर येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहारातील रक्कम इतरत्र वळवल्याचा आरोप आहे. हे प्रकरण २०१८ मधील असून, त्यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत हजारो कोटी रुपये इतरत्र व्यवहारात आणण्यात आले. त्यासाठी विविध बँक खात्यांचा वापर करण्यात आला होता. त्यातील काही रक्कम अविनाश भोसले यांनी इतरत्र वळवल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी सीबीआयने १ मे रोजी पुणे आणि मुंबईत शोध मोहीमही राबवली होती.

येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलमध्ये तीन हजार ७०० कोटी रुपये कर्ज स्वरूपात दिले होते. यात राणा यांना ६०० कोटी रुपये मिळाल्याचा आरोप आहे. त्यानंतर डीएचएफएलने भोसले यांच्याशी संबंधित कंपनीत पैसे वळते केले होते. त्याच्यासोबत बांधकाम व्यावसायिक सुनील छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुपकडेही हे पेसै गेल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले होते.

हेही वाचा : “अरे काय केलंय…,” उद्घाटनाला पोहोचताच अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले “मला बोलावताना विचार करा, मी तुमचा…”

सीबीआयने केलेल्या तपासणीत गैरव्यवहारातील रक्कम इतरत्र वळती करण्यात भोसले यांचा प्राथमिकदृष्टय़ा सहभाग आढळल्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अविनाश भोसले पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायिक आहेत. सुरुवातीच्या काळात रिक्षा चालक म्हणून काम करणारे भोसले पुण्यातील मोठे बांधकाम व्यवसायिक झाले. अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.