पुणे : ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात अटक केलेले डीआरडीओचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी मोहजालात अडकून देशाची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवली. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे; तसेच जलदगती न्यायालयात हा खटला चालवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अमर मुलचंदानी, विवेक आरहाना यांच्यासह चौघांची १२१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; ईडी’ची पुणे, पिंपरीत कारवाई

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कुरूलकर यांचे संबंध असल्याची चर्चा आहे. त्यावर राज्य कार्यसमितीच्या बैठकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी पुण्यात आले असताना त्यांनी त्यावर अधिक बोलणे टाळले होते. शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी विरोधी पक्षनेते पवार पुण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी कुरूलकर प्रकरणात सत्ताधारी काही बोलत नाहीत, याकडे पवार यांचे लक्ष वेधले. तेव्हा ते म्हणाले, की कुरुलकर यांनी जे काही केले तो देशद्रोह आहे. त्याबाबतचे सर्व पुरावे समोर आले आहेत. अशा व्यक्तींवर जबरदस्त कारवाई केली पाहिजे. त्याकरिता त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले गेले पाहिजे. जेणेकरून देशाशी गद्दारी करणाऱ्यांना कोणत्याही स्वरूपात माफ केले जाणार नाही, हा संदेश गेला पाहिजे.

अंगाशी आले की लोक गप्प बसतात’

कुरूलकर हे कोणाशी संबंधित होते, यांची माहिती पत्रकारांनी आणि जनतेनेही खोलवर जाऊन घेतली पाहिजे, असे सूचक वक्तव्यही विरोधी पक्षनेते पवार यांनी केले. अंगाशी आले की काही लोक जाणीवपूर्वक गप्प बसतात, असा टोलाही त्यांनी भाजपचे नाव न घेता या वेळी लगावला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar comment on drdo scientist pradeep kurulkar who arrested in honey trap case pune print news psg 17 zws