पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत २१ पैकी १४ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित ७ जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल समोर आला आहे. यानुसार आता राष्ट्रवादीच्या खात्यात पुणे जिल्हा बँकेच्या २१ पैकी १७ जागा आल्या आहेत. यासह जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचं वर्चस्व कायम राहिलं आहे. मात्र, एका जागेवरील पराभव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिव्हारी लागला आहे. यावर बोलताना मला तिथं ‘डाऊट’ होताच आणि तिथं ११ मतं कमी पडली, अशी माहिती अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

अजित पवार म्हणाले, “पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आम्ही ५ ठिकाणीच लिडला राहिलो, ८ ठिकाणी पिछाडीवर होतो. आंबेगाव तालुका, इंदापूर तालुका आणि इतर काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते कमी पडले. त्यामुळे ती जागा गेली. बाकीच्या जागा मात्र भरपूर मतांनी आल्या. महिलांच्या जागा काही हजाराच्या लिडने आल्या. दिगंबर दुरगाडेंच्या जागेवर जरा वेगळा प्रचार करण्याचा प्रयत्न केला, पण तिथंही आम्हाला चांगलं यश आलं.

readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
raj Rajshekhar emotional letter written to grandfather Rajshekhar
“प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
Rupali Bhosle will missing milind gawali after off air aai kuthe kay karte serial
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”
narendra modi akola public rally
मोदींच्या सभेसाठी अकोल्यात जय्यत तयारी; काय बोलणार याकडे लक्ष?
sharad pawar nagpur, Sharad Pawar visits Nagpur,
पवार यांचा नागपूर दौरा, भाजपला इशारा अन् कॉंग्रेस नेत्यांशी खलबते

“मला तिथं ‘डाऊट’ होताच आणि तिथं ११ मतं कमी पडले”

“अशोक पवार, सुनिल चांदेरे या जागा तर येणारच होत्या. तिथंही लोकांनी नवीन चेहऱ्यांना निवडून दिलंय. निवडून आलेल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. एका ठिकाणी आम्ही का कमी पडलो याबाबतची बारकाईने माहिती घेतोय. काय गडबड झाली हे पाहू. मला तिथं ‘डाऊट’ होताच आणि तिथं ११ मतं कमी पडले. बारामतीत जवळपास ४०-५० मतांचं लिड मिळालं. पुरंदर, दौंडसह ५ ठिकाणी लिड आहे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यांवर अजित पवार संतापले

अजित पवार म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांच्या ओबीसी आरक्षणाच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात कोण काय म्हटलं याची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही. मी माझी मतं स्पष्टपणे सांगण्यासाठी केव्हाही तयार असतो. त्याचा अनुभव सर्व पत्रकार घेत असता. त्यांनी काय म्हटल हे तुम्ही त्यांनाच विचारत चला.”

“मी क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने माझी भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. आमची हीच इच्छा आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीबद्दलचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय निवडणुका घेण्यातच येऊ नये. त्याही घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. तशापद्धतीने आम्ही ठरावही केला. ज्या सर्व गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या केलेल्या आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

“ओबीसी मुद्दा महाराष्ट्रापुरता राहिलेला नाही, यात राजकारण आणू नका”

अजित पवार म्हणाले, “ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रापुरता राहिलेला नाही. मध्य प्रदेशमध्ये देखील हा मुद्दा पुढे आलाय. तेही सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. इतर राज्यांमध्ये देखील अशाप्रकारचे मुद्दे येत आहेत. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे तो सगळीकडेच लागू होत असतो. त्यामुळे सर्वांनी यात कुठलंही राजकारण आणू नये.”

हेही वाचा : “५ दिवसात १० मंत्री आणि २० हून अधिक आमदार करोनाग्रस्त, यावरून…”, अजित पवारांचा गंभीर इशारा

“महाराष्ट्राची बाजू मांडण्याची वेळ आली तेव्हा केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दिलं नाही”

“सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडण्याची वेळ आली तेव्हा केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दिलं नाही. आता मध्य प्रदेशच्या वेळी प्रतिज्ञापत्रंही दिलं आणि हरिश साळवी यांच्यासारखे मोठे वकील दिले,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.