राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांबाबत महत्त्वाचं विधान केलंय. ओमायक्रॉनचा संसर्ग पाहता राज्यातील शाळा सुरू राहणार की बंद करणार आणि याबाबतचा निर्णय कोण घेणार यावर अजित पवारांनी उत्तर दिलं. स्थानिक लोकांमध्ये शाळेवरून निर्णय घेताना वाद होतात. त्यामुळे राज्य स्तरावरच याबाबत निर्णय घेणार आहे, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. ते पुण्यात बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “ओमायक्रॉन आल्याने शाळाबाबत चर्चा झाली. ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा अंदाज घेऊन शाळांबाबत निर्णय घेऊ. काही जणांनी स्थानिक लोकांना यावर निर्णय घेण्यास सांगू असं म्हटलं. पण त्यात पुन्हा वाद होतात. त्यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळांबाबतचा निर्णय राज्य स्तरावर घेण्यात येईल. त्या-त्या वेळेची परिस्थिती पाहून निर्णय घेतले, परत रद्द केले. काहीजण मग त्यात अगोदर एक आणि नंतर एक निंर्णय घेतात.”

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल

“सिरमकडे बूस्टर डोस उपलब्ध आहेत, पण…”

“आज ओमायक्रॉनचे रुग्ण पाहायला मिळत आहे. बूस्टर डोसबाबत काही सूतवाच केलं, पण आधी दोन्ही डोस पूर्ण करून त्यानंतर बुस्टर डोसचा विचार केला जाईल. सिरमकडे बूस्टर डोस उपलब्ध आहेत, पण बूस्टर डोसचा निर्णय देशाच्या पातळीवर झाला पाहिजे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

“कोविडबाबत आढाव घेतला ओमायक्रॉनबद्दल चर्चा सुरू असून आढाव घेण्यात आला. १ कोटी ३८ लाख लसीकरण झाले आहे. पहिला डोस १०० टक्के पूर्ण झाले आहे. नवीन ओमायक्रॉनसाठी प्रशासन सज्ज आहे. जे पॉझिटीव्ह रुग्ण आलेले होते त्यातील ७ पैकी ५ निगेटीव्ह आले आहेत. हे सगळे बाहेरच्या देशातून आले आहेत. बाहेरच्या देशातून आलेल्या आणखी लोकांना शोधण्याचा प्रयत्न करण्याचे काम सुरू आहे. प्रशासन सतर्क आहे. पहिला डोस जिल्ह्यात १०० टक्के झाला आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

“ज्याच्या चुका असतील त्याच्यावर एवढी कडक कारवाई केली जाईल की परत…”

आरोग्य विभागाच्या परीक्षांवरील आरोपावर बोलताना अजित पवार म्हणाले, “आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण एमपीएससीला या सगळ्या परीक्षा घेणं अवघड आहे,हे शासनाने घेतलेले निर्णय घेतले ते स्वीकारलं पाहिजे,ज्याच्या चुका असतील त्याच्यावर कारवाई केली जाईल,एवढी कडक कारवाई केली जाईल की परत कोणी अस करण्याची कारवाई करणार नाही. पेपरफुटी प्रकरणे झालेला पेपर रद्द करण्याची मागणी येतेय मात्र याबाबत राज्य स्तरावर निर्णय घेण्यात येईल.”

पुणे महापौरांवरील गुन्ह्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “एसटी संपाबाबत बोलताना नीट तारतम्य वापरावे. बोलताना सगळ्यांनी अरेला कारे करू नये. नीट बोलावे, काहीही बोलून सामाजिक तेढ निर्माण करू नये.”

हेही वाचा : “…तर दुसरा डोस न घेणार्‍यांवर कारवाईचा निर्णय”, बारामती, इंदापूर, दौंडकरांचा उल्लेख करत अजित पवारांचा इशारा

“बिबट्याचं प्रमाण जिल्ह्यात पुर्वीच्या तुलनेत वाढलं आहे. वाघांची जशी शिकार होऊ नये म्हणून काम केले जाते तसे बिबट्याच्या बाबतीत सरकार काम करत आहे. नागरिकांनीही काळजी घेतली पाहिजे,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.