पिंपरी : महापालिकेतील विविध कामांत भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले. त्याच्या खोलात जाणार आहे. चुकीचे काम झाल्यास कारवाई केली जाईल. आता मी पुन्हा सरकारमध्ये आलो आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी झपाटून काम करणार आहे. मी आल्यावर गर्दी होते, सुरक्षेसाठी रस्ते बंद ठेवावे लागतात. त्यामुळे निम्याच्यावर पिंपरी-चिंचवडकर झोपले असतानाच शहरात येऊन विकास कामांची पाहणी करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.

हेही वाचा – Video: मला परत बोलावण्याची पक्षश्रेष्ठींची जबाबदारी, सत्यजीत तांबे यांचे काँग्रेसमध्ये परतण्याचे संकेत

हेही वाचा – ‘चंद्रकांत’ विधानावर अजित पवार यांची माफी, म्हणाले..

बारामतीप्रमाणेच पिंपरी-चिंचवडवर माझे लक्ष आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वर्तुळाकार मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्यावर भर राहील. पुणे-नाशिक रेल्वेचे काम गतीने सुरू आहे. शाहू-फुले-आंबेडकर ही विचारधारा मी सोडलेली नाही. ही विचारधारा आणि वारकरी संप्रदायाचा विचार सर्वांना पुढे घेऊन जाईल. सर्वधर्मसमभाव ही भूमिका आहे. सर्वांना सुरक्षित वाटले पाहिजे असे काम आम्ही करणार आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष शिवसेनेसोबत जातील, असे कोणाला वाटले होते का? पण गेलोत. मी मंत्रालयात बसून काम करत होतो. राजकीय स्थित्यंतरे घडली. आम्ही सर्वांनी मिळून सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. काहींना वेगळे वाटले. पण, हरकत नाही, असेही पवार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar commented on the development works of pimpri chinchwad find out what he said ggy 03 ssb
Show comments