पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला. या मेळाव्याला महायुतीमधील नेतेमंडळी देखील उपस्थित होते.

तर या मेळाव्या प्रसंगी अजित पवार उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी म्हणाले की,मागील दहा वर्षाच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आपला देश प्रगतीपथावर आहे. आपल्या राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर विकास काम सुरू आहेत.त्यामुळे तिसर्‍यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी राज्यातील महायुतीच्या उमेदवारांना अधिकाधिक मतांनी निवडून द्यावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

Sharad Pawar on age
Sharad Pawar : “मी काय म्हातारा झालोय का? इथं एक म्हातारं…”, शरद पवारांचा मिश्किल सवाल; म्हणाले, “या लोकांच्या हाती…”
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”

हेही वाचा…मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खासगी प्रवासी बस जळाली

तसेच ते पुढे म्हणाले की, आजवर जिल्ह्यातील जनता माझ्या पाठीशी उभी राहिली आहे.याही निवडणुकीत माझ्या पाठीशी उभी राहिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून देताल, तसेच माझ्याकडे काही कार्यकर्ते आले आणि म्हणाले की,दादा तुम्ही केलेली काम आताच्या खासदारांनी (सुप्रिया सुळे) त्यांच्या कार्य अहवालाच्या पुस्तिकेमध्ये छापली आहेत.मी केल,मी केल.आहो, मी बारामतीमधील सर्व इमारती बांधल्या आहेत.मी हे केल,हे केल.तर मग भोर,वेल्हा या तालुक्यामध्ये काय काम केली. हे पण सांगाव,पण त्यांनी या दोन्ही ठिकाणी काहीच काम केल नाही.

२०१९ च्या प्रचारावेळी या भागातील एमआयडीसी चा प्रश्न मार्गी लावू,असे आश्वासन (सुप्रिया सुळे) त्यांनी दिले होते.त्याच पुढे काय झाले असा सवाल उपस्थित करीत ते पुढे म्हणाले की,नुसती भाषण करण्याची काम केली आहेत.मी तर सकाळी ७ वाजल्यापासून रात्रीपर्यंत भाषण करील,पण नुसती भाषण करून यांची पोट भरणार आहेत का? अशा शब्दात पवार गटाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांनी टोला लगावला.

हेही वाचा…महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंनी घेतले अजित पवारांचे आशीर्वाद! मावळ लोकसभेत रंगली वेगळीच चर्चा

तसेच ते पुढे म्हणाले की, तुम्ही लोकांनी त्यांना १५ वर्ष (सुप्रिया सुळे) निवडून दिले.पण तुम्हाला काहीच मिळाले नाही.पण आज मी तुम्हाला म्हणतो की,यांना (सुनेत्रा पवार) एकदा निवडून द्या, त्यांच काम नक्कीच दिसून येईल, असे सांगत पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांनी टोला लगावला.