पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला. या मेळाव्याला महायुतीमधील नेतेमंडळी देखील उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तर या मेळाव्या प्रसंगी अजित पवार उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी म्हणाले की,मागील दहा वर्षाच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आपला देश प्रगतीपथावर आहे. आपल्या राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर विकास काम सुरू आहेत.त्यामुळे तिसर्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी राज्यातील महायुतीच्या उमेदवारांना अधिकाधिक मतांनी निवडून द्यावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा…मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खासगी प्रवासी बस जळाली
तसेच ते पुढे म्हणाले की, आजवर जिल्ह्यातील जनता माझ्या पाठीशी उभी राहिली आहे.याही निवडणुकीत माझ्या पाठीशी उभी राहिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून देताल, तसेच माझ्याकडे काही कार्यकर्ते आले आणि म्हणाले की,दादा तुम्ही केलेली काम आताच्या खासदारांनी (सुप्रिया सुळे) त्यांच्या कार्य अहवालाच्या पुस्तिकेमध्ये छापली आहेत.मी केल,मी केल.आहो, मी बारामतीमधील सर्व इमारती बांधल्या आहेत.मी हे केल,हे केल.तर मग भोर,वेल्हा या तालुक्यामध्ये काय काम केली. हे पण सांगाव,पण त्यांनी या दोन्ही ठिकाणी काहीच काम केल नाही.
२०१९ च्या प्रचारावेळी या भागातील एमआयडीसी चा प्रश्न मार्गी लावू,असे आश्वासन (सुप्रिया सुळे) त्यांनी दिले होते.त्याच पुढे काय झाले असा सवाल उपस्थित करीत ते पुढे म्हणाले की,नुसती भाषण करण्याची काम केली आहेत.मी तर सकाळी ७ वाजल्यापासून रात्रीपर्यंत भाषण करील,पण नुसती भाषण करून यांची पोट भरणार आहेत का? अशा शब्दात पवार गटाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांनी टोला लगावला.
तसेच ते पुढे म्हणाले की, तुम्ही लोकांनी त्यांना १५ वर्ष (सुप्रिया सुळे) निवडून दिले.पण तुम्हाला काहीच मिळाले नाही.पण आज मी तुम्हाला म्हणतो की,यांना (सुनेत्रा पवार) एकदा निवडून द्या, त्यांच काम नक्कीच दिसून येईल, असे सांगत पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांनी टोला लगावला.