राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जसे स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात तसे जाहिर कार्यक्रमातील भाषणात सहज चिमटेही काढतात. त्याचाच प्रत्येय आज आला. पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात द्राक्ष बागायतदार परिषद पार पडली. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अजित पवार आले होते. यावेळी अजित पवार यांनी थेट वाइनवर बोलत असताना जोरदार फटकेवाजी केली. “अनेकांची कॅपिसिटी वेगवेगळी असते. अनेकांना पहिल्या धारेने किक बसते तर अनेकांना अख्खा खंबा घेतला तरी किक बसत नाही” असं अजित पवार यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… पुण्यातील गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत अजितदादांचा ‘वरचष्मा’, पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चांना उधाण

हेही वाचा… “आज मधूनच हिंदीत का बोलत आहात?” अजित पवारांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांना हसू आवरेना; पण पुढच्याच क्षणी…

अजित पवार म्हणाले, दर्दी लोक सांगतात इतर काही गोष्ट घेतली की किक बसते, वाइन ने किक बसत नाही. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. मी कधीच त्या गोष्टीला स्पर्श केला नाही. माझ्या सोबत काम करणाऱ्या अनेकांना माहिती आहे. पुढे ते म्हणाले, आदरणीय पवार साहेब नेहमीच तुमच्या मदतीला धावले. ते कृषिमंत्री असल्यापासून शेतकऱ्यांच्या मदतीला येतातच. म्हणूनच काल या परिषदेच्या शुभारंभाला पवार साहेब होते, आज समारोपाला अजित पवार आलेत. आता सगळे म्हणतील काय पवार- पवार चालवलंय. मुळातच तुमच्या द्राक्ष बागायतदार संघाचे चेअरमनचं पवारच आहेत. आता सगळेच पवार म्हटल्यावर पवारांचं चाललंय काय? अशी चर्चा रंगणार असं मिश्किल वक्तव्य अजित पवार यांनी केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar criticism on the issue of drinking in the draksha bagayatdar parishad in pimpri chinchwad city kjp 91 amy
Show comments